समय रैनाच्या अडचणी पुन्हा वाढल्या; अपंगत्वावर केलेल्या टिप्पणीमुळे Supreme Court संतापले; म्हणाले…

124
समय रैनाच्या अडचणी पुन्हा वाढल्या; अपंगत्वावर केलेल्या टिप्पणीमुळे Supreme Court संतापले; म्हणाले…
समय रैनाच्या अडचणी पुन्हा वाढल्या; अपंगत्वावर केलेल्या टिप्पणीमुळे Supreme Court संतापले; म्हणाले…

Supreme Court: ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे (India’s Got Latent) समय रैना (Samay Raina Controversy) अलीकडेच वादात सापडला होता. आता हास्यकलाकार समय रैना पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. समय रैनावर स्पाइनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी (SMA) ग्रस्त असलेल्या एका अंध नवजात बाळाची खिल्ली उडविल्याचा आरोप आहे. यावर न्यायालयाने ही तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. (Supreme Court)

मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोप क्युअर एसएमए फाउंडेशन ऑफ इंडियाने (Cure SMA Foundation of India) केले आहेत. फाउंडेशनने न्यायालयाला सांगितले की, एका शो दरम्यान दोन महिन्यांच्या बाळाच्या बाबतीत स्पाइनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफीच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. त्या इंजेक्शननंतरही मूल वाचेल याची कोणतीही हमी नाही. या विषयांवर खिल्ली उडवली होती.

(हेही वाचा – 26/11 Mumbai Attack मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता; माधव भंडारी यांचा घणाघाती आरोप)

समय रैनावरील आरोपांवर न्यायालयाची प्रतिक्रिया
समय रैनाविरुद्ध फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, असा आरोप  खूप त्रासदायक असून, हे प्रकरण गंभीर आहे. अशा आरोपांमुळे न्यायमूर्ती अस्वस्थ झाले आहेत. असे विधान न्यायमूर्ती सूर्यकांत (Justice Suryakant) यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.