भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान सोशल मीडियावर ‘ऑपरेशन सिंदूर’ वर (Operation Sindoor) आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मालवणीतील सलमा रफिक खान आणि कुर्ला कुरेशी नगर येथे राहणारा इंजिनिअर साहिल खान या दोघांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सलमा खानला नोटीस दिली असून साहिल खानला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सलमा रफिक खान (४०) ही मालवणी-मालाड येथील ओसीसीच्या खोली ३ मध्ये राहते आणि मालवणीमध्ये एक ब्युटी पार्लर चालवते. दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या फेसबुक अकाउंटवर ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित मजकूर पोस्ट केला होता. पोस्टमध्ये असे लिहिले होते की, “जेव्हा सरकारे बेपर्वा निर्णय घेतात तेव्हा दोन्ही बाजूंच्या निष्पाप लोकांना किंमत मोजावी लागते, सत्तेत असलेल्यांना नाही. पोस्टमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) बद्दल एक अश्लील शब्द देखील समाविष्ट होता. ही माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३५३ (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही तिला नोटीस बजावली आहे. तिच्या विरुद्ध यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत.
(हेही वाचा पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या Turkey आणि अजरबैजानवर ट्रॅव्हल्स एजंटचा बहिष्कार )
दरम्यान, एक बुरखेधारी महिला पाच ते सहा जणांसोबत विलेपार्ले रेल्वे स्थानकावर बेकायदेशीरपणे जमा होऊन विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील पादचारी पुलाच्या पायऱ्यावर चिटकवलेले पाकिस्तानी झेंडे काढू लागली, तिला झेंडे काढण्यास विरोध करणाऱ्या व्यक्तींना तीने आणि तिच्यासोबत असलेल्या अनोळखी पुरुषांनी शिवीगाळ आणि मारहाण केली, हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मोबाईल फोनच्या कॅमेरात कैद केला, लोकांचा संताप बघून या महिलेने तेथून पळ काढला. जुहू पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या महिलेचा शोध घेत आहे. या घटनेनंतर कुर्ला पूर्व कुरेशी नगर येथे राहणारा साहिल खान (२०) या विद्यार्थ्यांने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) संदर्भात भारताविरोधी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. चुनाभट्टी पोलीस ठाण्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन साहिल खान विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community