Saibaba Sansthan : शिर्डीतील साई संस्थान(Saibaba Sansthan)च्या कमर्चाऱ्याचा कारनामा उघडकीस आला आहे. साई संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. दक्षिणा पेटीतून दानाची मोजदाद करताना लाखोंची रोकड पळविली असून सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आला आहे.
साई संस्थान(Saibaba Sansthan)च्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात झालेल्या दान मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत लेखा विभागातील शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर याने ५०० रुपये नोटांचे बंडल चलाखीने लपविले. दि. ०४, ०८ आणि ११ एप्रिल रोजी ही चोरी करण्यात आली असून अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम असण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा Megablock : रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक ; वेळापत्रक पाहून बाहेर पडा … )
दरम्यान, १६ एप्रिलला दान मोजणी पूर्ण झाल्यावर नोटा मोजणी मशीनमध्ये ४६ हजार ५०० रुपये तर २५ एप्रिलला ५०० रुपयांचा आणखी एक नोटांचा बंडल आढळून आला. संबंधित कर्मचाऱ्यावर संस्थान(Saibaba Sansthan)कडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कर्मचाऱ्याचा भांडाफोड करण्यात आला.
संबंधित कर्मचाऱ्यावर संस्थानकडून बडतर्फीची कारवाई
दान मोजणीवेळीच्या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी शिपाई बाळासाहेब गोंदकर नोटा लपविताना दिसून आले. चोरलेल्या नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे फुटेजमधून स्पष्ट झाले. (Saibaba Sansthan)सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, अविनाश कुलकर्णी यांनी गोंदकर याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फीचीही कारवाई सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस घटनेचा अधिक तापस करत आहेत.(Saibaba Sansthan)
Join Our WhatsApp Community