ReleaseSharmistha : पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टियूटमधील कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली(ReleaseSharmistha)ला कोलकाता पोलिसांनी दिल्लीतील राहत्या घरातून बेकायदेशीर अटक केली. अत्यंत वादग्रस्त असे पाऊल कोलकाता पोलिसांनी उचलले असून शर्मिष्ठा(ReleaseSharmistha)वर अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कट्टरपंथीयांनी ईशनिंदा केल्याचा आरोप केला आहे. कायदा अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात असलेली शर्मिष्ठा(ReleaseSharmistha)ने सोशल मीडियावरील व्हिडिओत कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला.(ReleaseSharmistha)
(हेही वाचा Jyoti Malhotra Spy : मोहम्मद कासिमच्या अटकेनंतर हेर ज्योती मल्होत्राचं नवं कनेक्शन समोर )
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारने हिंदूविरोधात आक्रमक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अलीकडेच मुर्शिदाबाद हिंसाचारात जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करण्यात आले, असे खुद्द न्यायालयीन समितीने म्हटले होते. त्यानंतर आता महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बेकायदेशीर कृत्यांचे खोटे आरोप करत कायदेशीर सूचना न देताच अटक केली आहे. दरम्यान, दिल्लीच्या एका दंडाधिकाऱ्याने संध्याकाळी उशिरा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला होता त्यानंतर शनिवार, ३१ मे २०२५ दिवशी सकाळी शर्मिष्ठाला कोलकाता येथे हस्तांतरित करण्यासाठी ताब्यात घेण्याची परवानगी मिळाली.
महत्त्वाचे म्हणजे इस्लाम आणि पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल प्रक्षोभक आणि अपमानास्पद टिप्पणी असलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शर्मिष्ठा पानोलीला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्यांसह टीकेला सामोरे जावेळ लागले. त्यातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर #ArrestSharmishta हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. ममता सरकारच्या बेकायदेशीर कृत्याचा सोशल मीडियावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सद्यस्थितीस #ReleaseSharmistha हा हॅशटॅश एक्सवर ट्रेंड होत आहे.
शर्मिष्ठा पानोली प्रकरणात नेमका वाद काय?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी कारवाईच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. १४ मे २०२५ यादिवशी @Sharmishta_19 या एक्स हँडलवरून इस्लाम आणि पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल प्रक्षोभक आणि अपमानास्पद टिप्पणी असलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे शर्मिष्ठा पानोली यांना जीवे मारण्यासह बलात्काराची धमकी देण्यात आली होती.
#ArrestSharmishta हा हॅशटॅग ट्रेंडच्या माध्यमातून मुस्लिम समुदायातील लोकांनी कठोर कारवाईची मागणी केली. इस्लाम आणि पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी असलेल्या व्हिडिओवरून आता डिलीट केल्याबद्दल कोलकाता पोलिसांनी पुण्यातील कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली यांना दिल्लीतून अटक केली. पूर्वसूचना न देता, बेकायदेशीरपणाच्या दाव्यांमुळे ही अटक नुपूर शर्मा आणि यति नरसिंहानंद यांच्याशी संबंधित हाय-प्रोफाइल ईशनिंदा प्रकरणासम आहे.(ReleaseSharmistha)
Join Our WhatsApp Community