Ration Grain Scam: स्वस्त धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह ७ जणांना २ वर्षांची शिक्षा

170
Ration Grain Scam: स्वस्त धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह ७ जणांना २ वर्षांची शिक्षा
Ration Grain Scam: स्वस्त धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह ७ जणांना २ वर्षांची शिक्षा

अकोल्यात रेशन धान्य घोटाळ्याप्रकरणी (Ration Grain Scam) तत्कालीन पुरवठा अधिकारी आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांच्यासह ७ सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तब्बल २४ वर्षांपूर्वी हा घोटाळा उजेडात आला होता.

रामदयाल गुप्ता या ट्रान्सपोर्ट कॉण्ट्रॅक्टरला ५ वर्षांची शिक्षा  

तत्कालिन पुरवठा अधिकारी संतोष पाटील आणि तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश चव्हाण यांचा समावेश आहे. संतोष पाटील हे सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अकोला आणि वाशिम जिल्ह्यांतील नागरिकांना रेशनकार्डवर ( (Ration Grain Scam)) वितरित करण्यात येणारा ४५ लाख ७३ हजार २२६ रुपये किमतीचा ४८ ट्रक गहू परस्पर गायब केल्याचा आरोप या प्रकरणातील संशयित आरोपींवर होता. त्यावेळी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून रामदयाल गुप्ता कार्यरत होता. त्याने हा गहू मालेगाव, मंगरूळपीर, रिसोड आणि वाशीम येथे पोहोचता संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून परस्पर गायब केला होता. न्यायालयाने रामदयाल गुप्ता याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.