Crime News : तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रॅपिडो बाईक चालकाला अटक !

Crime News : तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रॅपिडो बाईक चालकाला अटक !

103
Crime News : तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रॅपिडो बाईक चालकाला अटक !
Crime News : तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रॅपिडो बाईक चालकाला अटक !

बस थांब्यावर नातेवाईकांची वाट पहात थांबलेल्या २२ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात विनयभंग करणाऱ्या रॅपिडो बाईक चालकाला विक्रोळी पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. उदय सुरेश खांबे (३७) असे अटक करण्यात आलेल्या रॅपिडो बाईक चालकाचे नाव आहे. खांबे हा मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणारा आहे. (Crime News)

हेही वाचा-फलटन रोड येथील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास कुणी अडवला? जागा रिकामी करून द्यायला BMC कडून होतो विलंब

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून विक्रोळी पूर्व येथे नातेवाईकाकडे आलेली २२ वर्षीय पीडित तरुणी ही १३ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग सर्व्हिस रोड येथील बस थांब्याजवळ नातेवाईकांची वाट पहात उभी होती. दरम्यान रॅपिडो बाईक उदय हा तीला एकटीला बघून थांबला, व त्याने आजूबाजूला कोणी नसल्याचे बघून तिच्याजवळ गेला आणि तिची छाती दाबून पळून गेला. (Crime News)

हेही वाचा- राज्य कामगार विमा योजनेंतर्गत Hospitals होणार अत्याधुनिक

अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत आरोपीने पळ काढला होता. पीडित तरुणी घाबरलेल्या अवस्थेत घरी आली, व तीने झालेला प्रकार नातेवाईकाना सांगितला, नातेवाईकांनी पीडित तरुणीसह विक्रोळी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विक्रोळी पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. (Crime News)

हेही वाचा- भारताने Indus Waters Treaty थांबवल्यावर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी तोडले अकलेचे तारे; म्हणाले

“पोलीस पथकाने घटनास्थळापासून ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर असलेले जवळपास ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, त्यातून आरोपीचा शोध घेऊन तांत्रिक आणि खबऱ्याच्या मदतीने आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली.” असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) विजयकांत सागर यांनी सांगितले. आरोपी रॅपिडो बाईक चालक असून तो पश्चिम उपनगरात राहणारा आहे, अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. असे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले. (Crime News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.