Ranjit Kasle : बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक !

Ranjit Kasle : बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक !

117
Ranjit Kasle : बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक !
Ranjit Kasle : बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक !

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेला (Ranjit Kasle) दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-Chenab River : जलयुद्धात भारताची सरशी ; चिनाब नदीच्या पाण्यावरून पाकचा ठणठणाट सुरू !

रणजीत कासलेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले असल्याची माहिती ही समोर आली आहे. रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड, परळी, अंबाजोगाई यासह मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता नव्याने दोन गुन्हे दाखल झाल्याने कासले समोरील अडचणी वाढण्याची शक्यता असतानाच रणजीत कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- “किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर …” ; CDS Anil Chauhan यांचे पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल मोठे विधान !

रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने आपले आरोप सत्र सुरूच ठेवले होते. अशातच शनिवारी (25 मे) रणजित कासले याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.