Raja Suryavanshi Murder Case : सोनम, राजसह सर्व आरोपींची चौकशी होणार, शिलाँग कोर्टाने ८ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी

मंगळवारी मध्यरात्री सोनमला शिलाँगला आणण्यात आले, तर इतर आरोपी बुधवारी ट्रान्झिट रिमांडवर आले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

70

शिलाँग न्यायालयाने (Shillong Court)  बुधवारी (११ जून २०२५) सोनम रघुवंशी आणि तिच्या चार साथीदारांना, मेघालयात हनिमून दरम्यान पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान या आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.  (Raja Suryavanshi Murder Case)

(हेही वाचा – American Embassy : बीकेसीतील दूतावासाबाहेर केवळ बॅगा सांभाळून लाखोंची कमाई करणाऱ्या रिक्षा चालकाला हटविले; कारण वाचून थक्क व्हाल)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोनमला मंगळवारी (१० जून २०२५) मध्यरात्री शिलाँगला आणण्यात आले, तर इतर आरोपी बुधवारी (११ जून २०२५) ट्रान्झिट रिमांडवर आले. पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे एसपी विवेक सय्यम म्हणाले, “पोलिसांनी सर्व आरोपींच्या १० दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती. न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.” सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून अटक करण्यात आले आहे. तर तिच्या साथीदारांना राजा रघुवंशी यांच्या हत्येचा कट रचण्यात कथित भूमिकेसाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक करण्यात आले आहे. 

सोनमने तिचा गुन्हा केला कबूल
सोनमने तिचा गुन्हा कबूल केला, तिचा पती राजा रघुवंशी यांच्या मृत्यूतील तिची भूमिका कबूल केली. मेघालय पोलिसांनी तिचा प्रियकर राज कुशवाहा (Raj Kushwaha) याला भेटून चौकशी केली तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. जेव्हा पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाहा यांना समोरासमोर आणले तेव्हा त्यांच्यासमोर रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचा रेनकोट आणि इतर पुरावे ठेवण्यात आले. पोलिसांनी या पुराव्यांबद्दल सोनमला विचारपूस केली तेव्हा ती गप्प बसली. पण यानंतर सर्व पुरावे पाहून सोनमने आपला गुन्हा कबूल केला. सोनमने कबूल केले की, तिने तिचा पती राजा रघुवंशी आणि आकाश राजपूत, विशाल उर्फ ​​विक्की ठाकूर आणि आनंद कुर्मी या तीन कॉन्ट्रॅक्ट किलरसह तिची हत्या केली होती.

पोलीस तपासात आतापर्यंत काय समोर आले आहे?
पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, सोनम मेघालयातील तिचा प्रियकर राज याला तिच्या लोकेशनची संपूर्ण माहिती देत ​​राहिली. ती हे लोक आता कुठे पोहोचले आहेत आणि ते पुढे काय करणार आहेत हे सांगत राहिली. पोलिसांनी असेही सांगितले की, लग्नानंतर लगेचच सोनमने तिचा प्रियकर राजसोबत मिळून तिचा पती राजा रघुवंशी यांना मारण्याचा कट रचला होता. हे सर्व योजनेनुसार करण्यात आले.

(हेही वाचा – American Embassy : बीकेसीतील दूतावासाबाहेर केवळ बॅगा सांभाळून लाखोंची कमाई करणाऱ्या रिक्षा चालकाला हटविले; कारण वाचून थक्क व्हाल)

पोलिसांनी असेही म्हटले आहे की, सोनमने तिच्या सासूला खोटे सांगितले की, तिने अपरा एकादशीचे उपवास ठेवला होता, तर हॉटेलमधून मिळालेल्या माहितीनुसार तिने जेवण केले होते. एवढेच नाही तर पोलिसांनी मेघालय रेल्वे स्टेशनवरून (Meghalaya Railway Station) हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केले. या प्रकरणात पोलीस तपासाची दिशाभूल करण्याचा सोनमने सर्वतोपरी प्रयत्न केला. तिने राजा रघुवंशी यांच्या फोनवरून एक सोशल मीडिया पोस्ट देखील शेअर केली, ज्यावर तिने ‘सात जन्मों का साथ’ असे कॅप्शन दिले. तथापि, कडक चौकशी केली असता, सोनमने सत्य उघड केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.