Raja Raghuvanshi Murder Case : राजाच्या हत्येत आणखी लोकांचा हात?, रघुवंशी कुटुंबियांनी केली मोठी मागणी

Raja Raghuvanshi Murder Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणा(Raja Raghuvanshi Murder Case)त आरोपी राज व पत्नी सोनम रघुवंशी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राजा रघुवंशीच्या कुटुंबियांकडून मुख्य आरोपी राज व सोनम यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

61

Raja Raghuvanshi Murder Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणा(Raja Raghuvanshi Murder Case)त आरोपी राज व पत्नी सोनम रघुवंशी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राजा रघुवंशीच्या कुटुंबियांकडून मुख्य आरोपी राज व सोनम यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपी पोलिसांची दिशाभूल करु शकतात त्यामुळे दोघांची नार्को टेस्ट करण्यात येत असून चाचणीच सत्य उघड करु शकते, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.(Raja Raghuvanshi Murder Case)

(हेही वाचा Shani Shingnapur : देवस्थानातील १६७ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, यात ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश; कारण नेमकं काय? )

दरम्यान, इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक असलेल्या राजा रघुवंशीचा मेघालयात मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात राजाची पत्नी सोनम रघुवंशी व तिचा प्रियकर राज कुशवाह यांना दोघांना अटक करण्यात आली. तपासात नवनवीन माहिती समोर आली असून दोघांसहित पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने राज व अन्य साथीदारांच्या मदतीने पती राजा रघुवंशीची हत्या केली.

राजा रघुवंशीच्या कुटुंबियांची नार्को टेस्टची मागणी

पोलीस तपासादरम्यानच राजा रघुवंशीच्या कुटुंबियांकडून नार्को टेस्टची मागणी करण्यात येत आहे. राजाचा भाऊ सचिन रघुवंशी म्हणाले, सोनम आणि कुशवाह पोलिसांची दिशाभूल करत असून नार्को चाचणीनंतरच सत्य बाहेर येईल. ते पुढे म्हणाले, हत्ये(Raja Raghuvanshi Murder Case)च्या कटात आणखी काही लोक सहभागी असू शकतात. नार्को चाचणीनंतरच ती नावे उघड होऊ शकतात, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. दरम्यान, सोनम व कुशवाह या दोघांनी राजाच्या हत्येचा कट रचला असून कुशवाहाने हत्येसाठी इतर तीन लोकांना पैसे दिले होते, असे पोलिसांनी सांगितले.(Raja Raghuvanshi Murder Case)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.