
-
प्रतिनिधी
मुंबई पोलिसांनी पंजाब राज्यातील चार जणांच्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी सुट्टीच्या दिवशी विमानाने मुंबईत येऊन एटीएम (ATM) मशीनमधून रोकड लुटून विमानाने पळून जात होती. या टोळीने मागील आठवड्यात पूर्व उपनगरातील घाटकोपर आणि नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अभुदय बँकेचे एटीएम मधील जवळपास १२ लाख रुपयांची रोकड चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. नेहरू नगर पोलीस आणि परिमंडळ ६च्या पथकाने या टोळीला पंजाब येथून अटक करून चोरीच्या पैशांतून विकत घेतलेली स्कोडा मोटार जप्त केली असल्याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडेकर यांनी दिली.
(हेही वाचा – फिनलँडमधील शिक्षण पद्धत समजून घेण्यासाठी BMC च्या शिक्षकांना पाठवा; राज्यपालांच्या सूचना)
जसबीर सिंग सुखदेव सिंग (२९), लखबीर सिंग बलदेव सिंग (३१), गुरुप्रीत सिंग कर्नल सिंग (२७) आणि रछपाल सिंग बलदेव सिंग (३७) असे अटक करण्यात आलेल्या टोळीचे नाव आहे. ही टोळी पंजाब राज्यातील भटिंडा जिल्ह्यात राहणारे आहेत. रविवार १ जून रोजी या टोळीने पूर्व उपनगरातील घाटकोपर पश्चिम येथील अभ्युदय बँकेच्या बाहेर असलेले एटीएम (ATM) मशीन उघडून त्यातील ८ लाख ८६ हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. याप्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घाटकोपर पोलीस या टोळीचा शोध घेत असताना ७ जून रोजी बकरी ईदच्या दिवशी या टोळीने कुर्ला पूर्व नेहरू नगर येथील अभुदय बँकेच्या एटीएम मशीन उघडून ३ लाख ७ हजार रुपयांची रोकड चोरी करून पळ काढला होता. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचा – सांगलीत Love Jihad; अल्पवयीन हिंदू मुलीचे धर्मांध चाँद शेखने केले अपहरण)
या टोळीचा शोध घेण्यासाठी नेहरू नगर पोलीस ठाण्याचे एक पथक आणि परिमंडळ ६ चे पथक मिळून या आरोपीचा कसून शोध घेत घेण्यात येत होता. परिमंडळ ६ च्या विशेष पथकाने कुर्ला नेहरूनगर तसेच रेल्वे स्थानक, कुर्ला टर्मिनस, येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ही टोळी सहार विमानतळाच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. परिमंडळ ६ आणि नेहरू नगर पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती काढून पंजाब येथून या टोळीला अटक केली. पंजाब राज्यातील भटिंडा जिल्ह्यात राहणाऱ्या या टोळीत रछपाल सिंग हा एटीएम (ATM) मशीन टेक्निशियन असून तो एटीएम मशीन तोडफोड न करता मशीन उघडून त्यातील रक्कम चोरी करीत होती. या टोळीने चोरीच्या पैशातून जुन्यातील स्कोडा कार विकत घेतली असून पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. पंजाब राज्यातून सुट्टीच्या आदल्या दिवशी मुंबईत विमानाने येऊन मुंबईतील एटीएम सेंटर येथे रेकी करून सुट्टीच्या दिवशी ही टोळी चोरी करीत होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नेहरू नगर पोलीस ठाण्याने या टोळीला अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ जून पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community