Pune Porsche Car Accident: ‘बाळा’च्या आजोबांना अटक! ड्रायव्हरला धमकी देणे पडले महागात

247
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना अटक! ड्रायव्हरला धमकी देणे पडले महागात
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना अटक! ड्रायव्हरला धमकी देणे पडले महागात

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी माहिती मिळत आहे. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल हा देखील पोलीस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहात आहे. सर्वात प्रथम वडिल, मग नातू आणि आता आजोबांना अटक करण्यात आली आहे. (Pune Porsche Car Accident)

धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने गुन्हा दाखल

ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (23 मे) रोजी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत लाडोबाला आजोबांनी चावी दिल्याची कबुली चौकशीत दिली होती. तरी, अटकेनंतर आता सुरेंद्र अग्रवाल यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Pune Porsche Car Accident)

अधिकाऱ्यांचे निलंबन

दरम्यान, आता पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणात वरिष्ठांना माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत. तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तसेच पुणेकरांना विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आणि त्यांच्या कुटुंबियासंदर्भात काही तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. (Pune Porsche Car Accident)

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे शहरात आणखीन 17 बार आणि पब्सवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील 17 बारचे परवाने करण्यात आले निलंबित करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. नियम मोडणाऱ्या पब्स आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई झाली आहे. 4 दिवसांत एकूण 49 बार आणि पब्सचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित करण्यात आले आहे. शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 14 पथकांकडून कारवाई होत आहे. (Pune Porsche Car Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.