Pune : शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने बनावट नोटा छापणार्या टोळीचा पर्दाफाश करत दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 28 लाख 66 हजार रुपये किमतीच्या बनावट, तर दोन लाख चार हजार रुपयांच्या खर्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune)
तसेच, नोटा छापण्याचे प्रिंटर, शाई, कोरे कागद, मोटार असे साहित्य देखील मिळून आले आहे. दरम्यान, या टोळीची व्याप्ती मोठी आहे. परराज्यांपर्यंत त्याचे धागेदोरे असून, रॅकेटमध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कोटक महिंद्रा बँकेतर्फे (Kotak Mahindra Bank) दाखल देण्यात आलेल्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या शिवाजीनगर शाखेत २०० रुपयांच्या बनावट नोटा जमा करण्यात आल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तेथील व्यवस्थापकांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार कळवला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सखल तपास जारी करण्यात आला. बँकेत कोणत्या खात्यात ही रक्कम भरली गेली तेथून तपासाला सुरुवात झाली, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (DCP Sandeep Singh Gill) यांनी दिली.