Pune Drugs Case : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचे सेवन! दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणी ड्रग्स सेवन करताना दिसत आहेत. पुणे-नगर रस्त्यावरील मॉलमधील हा व्हिडीओ असल्याचं दिसत आहे.

154
Pune Drugs Case : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचे सेवन! दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल
Pune Drugs Case : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचे सेवन! दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल

पुण्यातील एफसी रोडवरील (Pune FC Road) हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशाच प्रकारे पुणे-नगर रोडवरील (Pune-Nagar Road) मॉलमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचं दिसत आहे.  (Pune Drugs Case)

(हेही वाचा – Manoj Jarange यांना पाठिंबा कि OBC बांधवांची भूमिका मान्य ?; शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी)

पुणे ड्रग्जच्या विळख्यात?

पुण्यातील FC रोडवरील L3 – Liquid Leisure Lounge मध्ये पहाटेपर्यंत पार्टी झालेल्या पार्टीमध्ये काहीजण ड्रग्जचे सेवन करताना दिसून आले. तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर झळकला. आता आणखी एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुणे-नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमध्ये असलेल्या पबमधील असल्याचा दावा करण्यात येत असून तो काही दिवसांपूर्वीचा आहे. व्हिडीओमध्ये तरुणी वॉशरूममध्ये ड्रग्जचे सेवन करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांचा व्हिडीओ काढणारी महिला त्यांना तुम्हाला ड्रग्ज कसे घ्यायचे, याचा फॉर्मुला सांगितला आहे. एकंदरीत पुण्यातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे असेच म्हणता येईल. पुण्यातील पबमध्ये असे प्रकार सुरु असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येते. (Pune Drugs Case)

(हेही वाचा – Bhau Torsekar यांना पाठवलेली कायदेशीर नोटीस मागे, भाजपच्या Shweta Shalini यांच्या ट्विटची चर्चा)

पुणे शहरात ड्रग्जचं रॅकेट कार्यरत आहे का?

रविवारी पुण्यातील प्रमुख एफसी रोडवरील एका बारमध्ये ड्रग्जच सेवन केलं जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळं पुणे शहरात ड्रग्जचं रॅकेट कार्यरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्याकाही दिवसांत अशा अनेक घटना पुण्यात वाढल्या असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. (Pune Drugs Case)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.