Pune Crime: पिंपरी-चिंचवड शहरात कोयता गँगची दहशत, दुकान मालकावर कोयत्याने हल्ला

चिंचवड गावातील पूजा वाईन्स या ठिकाणी काही वेळापूर्वी ही धक्कादायक घटना घडली आहे.

241
Pune Crime: पिंपरी-चिंचवड शहरात कोयता गँगची दहशत, दुकान मालकावर कोयत्याने हल्ला
Pune Crime: पिंपरी-चिंचवड शहरात कोयता गँगची दहशत, दुकान मालकावर कोयत्याने हल्ला

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली आहे. स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने किरकोळ वादातून वाईन शॉप चालकावर कोयत्याने वार (Pune Crime) करून तसेच दगडाने हल्ला केला आहे.

चिंचवड गावातील पूजा वाईन्स या ठिकाणी काही वेळापूर्वी ही धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्येदेखील कैद झाली आहेत. वाईन शॉपमध्ये बिल घेण्याच्या वादातून स्थानिक गावगुंड आणि वाईन शॉप चालकामध्ये वादावादी झाली. याच वादातून गावगुंडांच्या टोळक्याने सुरुवातीला वाईन शॉप चालकावर तसेच वाईन शॉपमधील कामगारांवर लाथाबुक्क्याने मारहाण करून दगडाने हल्ला केला.

(हेही वाचा – Eknath Shinde: संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करून देणार )

त्यानंतर एका गावगुंडाने त्या ठिकाणी येऊन कोयत्याने वाईन शॉप चालक आणि वाईन शॉपच्या कामगारांवर हल्ला केला आहे. या घटनेची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून वाईन शॉप चालकाच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस स्थानकात स्थानिक गावगुंडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.