Pune Accident : झिपलायनिंग ठरली जीवघेणी ! पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा मृत्यू

Pune Accident : झिपलायनिंग ठरली जीवघेणी ! पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा मृत्यू

215
Pune Accident : झिपलायनिंग ठरली जीवघेणी ! पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा मृत्यू
Pune Accident : झिपलायनिंग ठरली जीवघेणी ! पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा मृत्यू

पुण्यातील (Pune Accident) भोर परिसरात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. संबंधित तरुणी झिपलायनिंग करण्यासाठी गेली असताना ३० फूट उंचीवरून जमिनीवर पडली. ताबडतोब तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Pune Accident)

हेही वाचा-Jammu and Kashmir Flood : ऐन उन्हाळ्यात जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी! अचानक पूर आल्याने १०० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त ; बचावकार्य सुरू, Video Viral 

याप्रकरणी राजगड पोलिसांत आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. तरल अरुण आटपाळकर (२८) असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरल पुण्यातील नऱ्हे परिसरात वास्तव्यास होती. दरम्यान, शुक्रवारी ती आपल्या कुटुंबासोबत पुणे-सातारा महामार्गावरील वरवे खुर्द गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्कला फिरायला गेली. (Pune Accident)

हेही वाचा- Donald Trump : अमेरिकेत हजारो लोकांचा व्हाईट हाऊसला वेढा ; 50 राज्यांमध्ये निदर्शने

या वॉटर पार्कमध्ये सर्व कुटुंब राईडचा आनंद लुटत होते. तरल हिला झिपलायनिंग करण्याचा मोह आवरला नाही. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरल झिपलायनिंग करण्यासाठी गेली. रोपवरून चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजुला रेलिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेलिंगपर्यंत तिचा परत नव्हता. यामुळे तिने जवळ असलेल्या लोखंडी स्टूलवर उभी राहून दोर लावण्याचा प्रयत्न करू लागली. पण अचानक स्टूल हलला आणि ती ३० फूट उंचीवरून खाली जमीनीवर पडली. (Pune Accident)

हेही वाचा- Election Commission : 22 कोटी मतदार ‘आधार’शी लिंक नाहीत ; आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी

यानंतर तिला तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पंरतु, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास केला जात आहे. कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pune Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.