Publicity Stunt By Urfi Javed : उर्फी जावेदला स्टंट येणार अंगाशी… आता खरोखरच कारवाई होणार…

155
Publicity Stunt By Urfi Javed : उर्फी जावेदला स्टंट येणार अंगाशी... आता खरोखरच कारवाई होणार...
Publicity Stunt By Urfi Javed : उर्फी जावेदला स्टंट येणार अंगाशी... आता खरोखरच कारवाई होणार...

स्वस्त प्रसिद्धीसाठी नागडंउघडं फिरणारी वादग्रस्त मॉडेल उर्फी जावेद हिचा नवा स्टंट आता तिच्या अंगाशी येणार आहे. (Publicity Stunt By Urfi Javed) पोलिसांनी अटक केल्याचे रील बनवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न तिला खरोखरच कोठडीची हवा खायला लावू शकतो. स्वस्त प्रसिद्धीसाठी उर्फी जावेद हिने तोकडे कपडे घातल्यामुळे पोलीस अटक करत आहेत, असे रील इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून उर्फीला खरेच अटक झाली आहे, असे वाटते.

या व्हिडिओमध्ये दोन महिला कॉन्स्टेबल उर्फीला पोलीस ठाण्यात सोबत येण्यास सांगत आहे, उर्फी त्यांना ‘माझा गुन्हा काय ?’, असे विचारत आहे. एक महिला कॉन्स्टेबल तिला ‘तुझ्या तोकड्या कपड्यामुळे साहेबांनी तुला घेऊन येण्यास सांगितले आहे’, असे बोलून तिला एका काळ्या रंगाचा स्कॉर्पिओ गाडीत बसवत आहेत. मोटारीजवळ एक दोन स्टार (पीएसआय) दर्जाचा अधिकारी उभा आहे आणि उर्फीला घेऊन मोटारीत बसण्याची सूचना कॉन्स्टेबलला देत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे नेटकऱ्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. त्यात मुंबई पोलीस दलाचा गणवेश घालून तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे उर्फीवरच कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Publicity Stunt By Urfi Javed)

(हेही वाचा – Ghodbunder Traffic : ‘या’ कारणामुळे 28 नोव्हेंबरपर्यंत घोडबंदर परिसरातील वाहतुकीत बदल)

व्हायरल व्हिडिओचे सत्य

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस नसून उर्फीची अटक देखील खोटी आहे. हा व्हिडिओ केवळ प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेला आहे. या व्हिडीओमध्ये ज्या महिला कॉन्स्टेबल दिसतात, त्यातील एका महिला कॉन्स्टेबलने हाताच्या नखांना नेलपॉलिश लावले आहे. दोन्ही महिला कॉन्स्टेबलने पायात घातलेले बूटदेखील चुकीचे आहेत. तसेच या व्हिडिओमधील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) दर्जाच्या अधिकारी यांच्या खांद्यावर असलेल्या दोन स्टारच्या खाली ‘मपोसे’ असे लिहलेले आहे. (प्रत्यक्षात पीएसआयच्या स्टार खाली केवळ म.पो असते. तीन स्टार असतील, तर ‘मपोसे’ लिहिले जाते.) व्हिडिओत दाखवलेले काळ्या रंगाचे वाहन देखील पोलीस ठाण्यात वापरले जात नाही. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ एटीएस किंवा गुन्हे शाखेचे अधिकारी वापरतात ते देखील खूप कमी प्रमाणात. त्यामुळे उर्फीच्या अटकेचा व्हिडिओ हा बनावट असल्याचे समोर आले आहे. (Publicity Stunt By Urfi Javed)

याबाबत एका पोलीस अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता या चुकीचा व्हिडीओ बनवून तो समाज माध्यमातून प्रसारित करणे गुन्हा आहे, या बनावट व्हिडिओ प्रकरणी उर्फीच्या अडचणी वाढू शकतात, असे मत अधिकारी यांनी मांडले. (Publicity Stunt By Urfi Javed)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.