देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी (Panjab Police) आता आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. गगनदीप सिंग (Pakistani spy Gagandeep Singh) असे या गुप्तहेराचे नाव असून तो पाकिस्तानात राहणाऱ्या गोपाल सिंग चावला नामक खलिस्तानी दहशतवाद्यामार्फत गोपनीय माहिती पुरवत होता. (Pakistani Spy)
(हेही वाचा – भारत-पाकिस्तान सीमेजवळ होणार Operation Sindoor स्मृती उद्यान; ‘या’ राज्याने घेतला पुढाकार)
याबाबत माहिती देताना पंजाब पोलिसांनी सांगितले की, काउंटर-इंटेलिजन्स-पंजाबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, तरमतारण पोलिसांनी संयुक्त कारवाईत गगनदीप सिंग उर्फ गगन याला अटक केली. गगन पाकिस्तानातील आयएसआय आणि खलिस्तान समर्थक गोपाल सिंग चावला यांच्या संपर्कात होता आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान लष्कराच्या कारवायांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर करत होता. तपासात असे आढळून आले की सैन्याशी संबंधित हालचाली आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकणाऱ्या इतर गोपनीय माहिती पाकिस्तानला देत होता. गगनदीप सिंग गेल्या 5 वर्षांपासून खलिस्तानी गोपाल सिंग चावला याच्या संपर्कात होता, ज्यांच्या माध्यमातून तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला होता.
(हेही वाचा – दहशतवादाच्या विरोधात जागतिक समर्थन मिळवणाऱ्या खासदारांना PM Narendra Modi भेटणार)
पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव (Punjab Police DGP Gaurav Yadav) म्हणाले की, गगनदीपनेही पीआयओमार्फत पैसे घेतले होते. त्याने मोबाईल फोनद्वारे पीआयएला गुप्तचर माहिती दिली. याशिवाय, तो आयएसआय लोकांच्या संपर्कात होता. या संदर्भात पोलिसांनी तपशील मिळवला आहे. आरोपीविरुद्ध तरणतारण पोलीस स्टेशनमध्ये (Tarn Taran Police Station) अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले.
(हेही वाचा – Northeast flood: ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे कहर! ३६ जणांचा मृत्यू, लाखो बेघर)
आरोपीकडून काय सापडले ?
- आयएसआय एजंटना पाठवण्यात आलेली गुप्तचर माहिती असलेला मोबाईल फोन.
- आयएसआयशी संबंधित २० हून अधिक संपर्कांची माहिती दिली.
- पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून भारतामार्फत मिळालेल्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे दिले.
(हेही वाचा – Ayodhya नगरी सजली; राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा 5 जून रोजी)
पोलिसांनी तपास केला सुरू
या हेरगिरी नेटवर्कचे संपूर्ण रूप बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि गुप्तचर संस्था आरोपींच्या आर्थिक आणि तांत्रिक नेटवर्कची सखोल चौकशी करत आहेत. प्राथमिक पुराव्याच्या आधारे, तरणतारण शहर पोलीस ठाण्यात अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पुढील कारवाई जलदगतीने केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community