पाकिस्तानशी हेरगिरी केल्या प्रकरणात राजस्थान जैसलमेर जिल्ह्यातील जिल्हा रोजगार अधिकारी शकूर खान (Pakistani Spy Shakur Khan) याला अटक केली आहे. शकूर खान हा काँग्रेसच्या काळात कॅबिनेट मंत्र्याचा स्वीय सहाय्यक होता. शकूर खान याची झडती घेतली असता, त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानच्या अनेक मोबाईल क्रमांक सापडले आहेत. या क्रमांकावर अनेक कॉल केले गेले आहेत. शकुरचे ज्योती मल्होत्रा (Pakistani Spy Jyoti Malhotra) हिच्याशी देखील संबंध होते असे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. (Pakistani Spy)
(हेही वाचा – Pakistani Spy: पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; ऑपरेशन सिंदूरची माहिती पाठवणाऱ्या गुप्तहेराला अटक)
देशात भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर हेरगिरीची एकामागून एक प्रकरणे बाहेर पडत आहेत. यापूर्वी पंजाब पोलिसांनी गगनदीप सिंग (Pakistani spy Gagandeep Singh) असे या गुप्तहेराचे नाव असून तो पाकिस्तानात राहणाऱ्या गोपाल सिंग चावला नामक खलिस्तानी दहशतवाद्यामार्फत गोपनीय माहिती पुरवत होता. आता राजस्थानच्या जैसलमैरचे सध्याचे जिल्हा रोजगार अधिकारी शकूर खान (Shakur Khan) याला अटक केली आहे. शकूर खान कॉंग्रेस सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाले मोहम्मद (Congress Cabinet Minister Shale Mohammad) यांचा खासगी सचिव होता. गेल्या काही वर्षांपासून त्याने सात वेळा पाकिस्तानचा प्रवास केला आहे. तो पाक दुतावासाच्या (Pakistani Embassy) अधिका-यांच्या संपर्कात होता. शकूरचे कनेक्शन हिस्सार येथून जेरबंद झालेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीच्याशी असल्याचे उघडकीस आले आहे.
माजी मंत्र्यांशी संबंध
सालेह मोहम्मद यांच्या मूळ गाव भागूपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बडोदा गावातील मंगलियाओं धानी या गावात शकूरचे कुटुंब राहते. माजी काँग्रेस मंत्र्यांशी असलेले कनेक्शन समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना देशभक्ती दाखवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मंत्र्यांच्या सहाय्यकाला गुप्त माहिती मिळवण्याची संधी मिळलीच असेल. जर ती माहिती त्याने शत्रू देशाला दिली असेल, तर ही चिंतेची बाब आहे.
(हेही वाचा – जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर Maulana Abdul Aziz Isar चा गूढ मृत्यू)
सीमेपलीकडील लोकांशी संपर्क
शकूर खानकडे इस्लामाबादमधील काही लोकांचे फोन नंबर असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे तो सीमेपलीकडील लोकांशी संवाद साधत होता, आणि त्यांच्याशी महत्त्वपूर्ण माहिती शेअर करत असल्याचा संशय आहे. सीमेपलीकडील लोकांना तो देशाची संवेदनशील माहिती देत असल्याचा आरोप आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community