Pakistani Spy : पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या अरमानला हरियाणाच्या नूंहमध्ये अटक; ISIला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप

108
Pakistani Spy : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असतानाच पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेल्या ज्योती मल्होत्रा या तरुणीला सुरक्षा यंत्रणांनी शनिवार १७ मे ला अटक केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी नूंह येथून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकल्या आहेत. जो पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यात सहभागी होता. तसेच आरोपीची ओळख पटली असून अरमान असे त्याचे नाव आहे. संबंधित आरोपी हा जमील, रजका गावातील रहिवासी आहे. यासंबंधी नगीना पोलीस स्थानक, नूहं येथे त्याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pakistani Spy)

(हेही वाचा – हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच; सच्चिदानंद परब्रह्म Dr. Jayant Athavale यांचे उद्गार)

लष्कराची गुप्तचर माहिती पाकिस्तानला पाठवली
पोलिसांच्या माहितीनुसार, अरमान बऱ्याच काळापासून भारतीय लष्कर, डिफेन्स एक्स्पो २०२५ आणि इतर लष्करी कारवायांशी संबंधित संवेदनशील माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानला पाठवत होता. या माहितीमुळे देशाच्या सुरक्षेला आणि धोरणात्मक तयारीला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. नगीना पोलीस ठाण्याला गुप्त माहिती मिळाली होती, की एक तरुण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपद्वारे शत्रू देशाला माहिती पुरवत आहे. या आधारावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी अरमानला ताब्यात घेतले.
अरमानच्या मोबाईलमधून धक्कादायक खुलासे आले समोर
अरमानच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता, पाकिस्तानच्या ९२ सिरीज नंबरवरून चॅट्स, कॉल लॉग, फोटो आणि व्हिडिओ सापडले. विशेष म्हणजे, डिफेन्स एक्स्पो २०२५ चे फोटो आणि लष्करी कारवायांशी संबंधित इतर साहित्य सापडले, जे त्याने पाकिस्तानी एजंटना पाठवले होते. आरोपींकडून दोन मोबाईल फोन आणि दोन सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. तो त्यांचा वापर हेरगिरीसाठी करत होता. याशिवाय तो दुसऱ्या मोबाईल नंबरवरूनही संशयास्पद हालचाली करत होता.

(हेही वाचा – राजस्थानात हजाराहून अधिक Bangladeshi Infiltrators, तर हरियाणात ‘बंगाली’ म्हवणाऱ्या घुसखोरांना बनावट कागदपत्रांसह अटक)

केंद्रीय संस्था अरमानच्या नेटवर्कची चौकशी करणार
पोलीस आणि केंद्रीय एजन्सी आता अरमानचे नेटवर्क किती मोठे आहे आणि त्यात इतर लोकांचाही सहभाग आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हेरगिरीच्या बदल्यात त्याला काही आर्थिक लाभ मिळाले का आणि त्याने भूतकाळात अशा कारवायांमध्ये भाग घेतला होता का, हे देखील तपासात शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमानने लष्करी तळ, संरक्षण कार्यक्रम आणि संभाव्य लष्करी कारवायांचे स्थान आणि इतर महत्त्वाची माहिती शेअर केली होती, जी धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील होती. नुहं पोलीस ठाण्याने आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि इतर कलमांव्यतिरिक्त, अधिकृत गुपिते कायदा, १९२३ आणि देशद्रोहाशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. 
(हेही वाचा – ‘तो सूड नव्हता तर…’; Operation Sindoor बाबत भारतीय सैन्याचा नवा व्हिडिओ समोर)
अरमानच्या अटकेमुळे हेरगिरी नेटवर्कमधील इतर संशयितांवर कारवाई होऊ शकते. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे आणि सुरक्षा संस्था या रॅकेटची संपूर्ण यंत्रणा उघड करण्यासाठी काम करत आहेत.

हेही पहा –

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.