पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात सांताक्रूझ (Santa Cruz) पूर्व येथे निदर्शने करण्यासाठी जमलेल्या दोन समुदायांमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या हाणामारीनंतर वाकोला (Vakola) पोलिसांनी रविवारी बेकायदेशीरपणे जमणे, दंगल करणे आणि हिंसक दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली. (Pahalgam Terror Attack)
(हेही वाचा – Indian Army साठी देणगी मागणाऱ्या फसव्या संदेशाला बळी पडू नका; संरक्षण मंत्रालयाचे आवाहन)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी प्रत्येक समुदायातील ५० हून अधिक लोक वाकोला येथे जमले होते. शोक आणि एकता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दोन्ही समुदायांमध्ये वाद झाल्याने हिंसक वळण लागले. दोन्ही गटातील काही लोकांमध्ये हाणामारी सुरू झाली, ज्यामुळे काही जण जखमी झाले,जखमींना व्हीएन देसाई रुग्णालयात नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हाणामारी सुरू झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि चौकशीसाठी काही लोकांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले.
चौकशीनंतर सात जणांना अटक करण्यात आली, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सांताक्रूझ (पूर्व) येथील नेहरू नगर परिसरात एका समुदायातील सुमारे ५० लोक घोषणाबाजी करत जमले होते. त्यानंतर दुसऱ्या समुदायातील एक गट तिथे पोहोचला आणि दुसऱ्या समुदायाशी हाणामारी करू लागला. असे अधिकाऱ्याने सांगितले. या हाणामारीमुळे दुकानांची तोडफोड झाली आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे जेणेकरून इतर सहभागी लोकांची ओळख पटेल. वाकोला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १८९ (बेकायदेशीर जमवाजमव), १९१ (दंगल) आणि ११५ (२) (हल्ला) अंतर्गत स्वतःहून गुन्हा दाखल केला. (Pahalgam Terror Attack)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community