इसिसच्या गुप्तहेराला उत्तर प्रदेशात अटक, Operation Sindoor बाबत शत्रूला देत होता महत्त्वाची माहिती

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैरानामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. Operation Sindoor अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्या. त्यातच आता उत्तर प्रदेशात नोमान इलाही इसिस(ISI)चा गुप्तहेर निघाल्याचे उघडकीस आले आहे.

52

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैरानामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. Operation Sindoor अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्या. त्यातच आता उत्तर प्रदेशात नोमान इलाही इसिस(ISI)चा गुप्तहेर निघाल्याचे उघडकीस आले आहे. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)दरम्यान शत्रू देशाला महत्त्वाची माहिती पुरवत होता असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) दरम्यान इसिसचा गुप्तहेर मोबाईल आणि सोशल मीडियाद्वारे भारतीय सैन्याच्या कारवायांची माहिती देत असे, असा खुलासा नोमानने केला.

नोमानच्या घरातून ८ संशयास्पद पासपोर्ट जप्त करण्यात आले असून बेगमपुरा परिसरातील नोमान इलाही याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करताना पकडण्यात आले. नोमन पूर्वी बेरोजगार होता आणि तो त्याच्या वडिलांसोबत पासपोर्ट आणि कागदपत्रे बनवण्याचे काम करायचा अशी माहिती समोर आली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने व्यवसाय हाती घेतला पण तो लोभी झाला आणि इसिसच्या हेरगिरी नेटवर्कमध्ये सामील झाला.

(हेही वाचा India Turkey Trade : भारतीय विमान कंपन्या तुर्कीबरोबरचा करार रद्द करतील का? )

तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, पासपोर्ट सेवा केंद्राच्या नावाखाली नोमान सौदी अरेबिया, पाकिस्तान किंवा इतर देशांमध्ये जाण्याची योजना आखणाऱ्या लोकांसाठी कागदपत्रे तयार करत असे. महत्त्वाचे म्हणजे नोमानच्या घरातून आठ संशयास्पद पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. कागदपत्रे बनवण्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्रात काम करत असताना, नोमान आयएसआय एजंट इक्बाल काना यांच्या संपर्कात आला आणि त्याने देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवण्यास सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे नोमानने चार वेळा पाकिस्तानला भेट दिली असून जिथे तो इसिसच्या अधिकाऱ्यांना भेटला.

हरियाणा पोलिसांनी त्याला पानिपत येथून अटक केली, जिथे तो चार महिने त्याच्या बहिणीच्या घरी राहत होता. नोमान एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. चौकशीदरम्यान, नोमानने कबूल केले की, ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) दरम्यान आयएसआय सक्रिय होता आणि तो मोबाईल आणि सोशल मीडियाद्वारे भारतीय सैन्याच्या कारवायांची माहिती पाठवत असे. त्याच्या घरातून आठ संशयास्पद पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. (Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.