रक्सौल येथे मानवी तस्करीचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दला(RPF)ने उधळून लावला आहे. ‘Operation AAHT’अंतर्गत चार अल्पवयीन मुलींची आरपीएफकडून सुटका करण्यात आली. RPFने रक्सौल रेल्वे स्थानकावर दि. १३ मे २०२५ रोजी सकाळी केलेल्या जलद आणि समन्वित कारवाईत अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली.
दरम्यान, बाल सुरक्षा आणि तस्करीविरोधी प्रयत्नांसाठी रेल्वे सुरक्षा दलाची अढळ वचनबद्धता पुन्हा एकदा दिसून आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रक्सौल चौकीतील आरपीएफ पथकाने जीआरपी रक्सौल, एसएसबी मानवी तस्करीविरोधी युनिट, रेल्वे चाइल्डलाइन-रक्सौल आणि स्वयंसेवी संस्था ‘प्रयास जुवेनाईल एड सेंटर’ यांच्याशी समन्वय साधत गाडी क्रमांक १५२७३ रक्सौल-आनंद विहार सत्याग्रह एक्सप्रेसमधून १३ ते १७ वयोगटातल्या चार मुलींची सुटका केली.
अल्पवयीन मुलींची नोकरीच्या संधी आणि गोरखपूरमधील बेपत्ता नातेवाईकाला शोधण्यात मदत करण्याच्या खोट्या आश्वासनांच्या नावाखाली नेपाळमधून तस्करी करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले. मुलींच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रवासाची काहीच माहिती नव्हती, असेही तपासाअंती समोर आले आहे. तस्करांकडून विशेषतः सीमावर्ती भागातील गरीब व्यक्तींसाठी, त्यांचे शोषण करण्यासाठी ही युक्ती सामान्यपणे वापरली जाते.Operation AAHT
Join Our WhatsApp Community