
ओडिशाच्या (Odisha) भुवनेश्वर शहरात गुरुवारी एक धक्कादायक घटना समोर आली असून, ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. शहरातील एका अपार्टमेंटमध्ये झालेल्या छाप्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल खिडकीतून खाली फेकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमागे राज्याच्या बांधकाम विभागातील एक वरिष्ठ सरकारी अभियंता असल्याचं समोर आलं आहे. (Odisha)
#WATCH | Bhubaneswar: Odisha Vigilance Department conducted searches at 7 locations of Odisha Rural Works Division Chief Engineer, Baikuntha Nath Sarangi
About Rs 1 crore has been recovered from his flat in Bhubaneswar, while about Rs 1.1 crore has been recovered from his… pic.twitter.com/n8MQxYfU0L
— ANI (@ANI) May 30, 2025
ओडिशा (Odisha) व्हिजिलन्स विभागाने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (रस्ते) बैकुंठ नाथ सारंगी यांच्या निवासस्थानी आणि इतर सहा ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत भुवनेश्वर, अंगुल आणि पिपली परिसरातील घरांवर छापे टाकण्यात आले. छाप्यादरम्यान एकूण २.१ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड सापडली आहे.
Odisha Vigilance officials on Friday seized unaccounted cash worth over Rs 2.1 crore during searches at multiple locations linked to Baikuntha Nath Sarangi, Chief Engineer (Plan Roads), Rural Works Department, Bhubaneswar. pic.twitter.com/0i5naaWqqO
— India Recap (@indiarecapnews) May 30, 2025
विशेष म्हणजे, छाप्याची कुणकुण लागताच बैकुंठ नाथ सारंगी यांनी आपल्या भुवनेश्वरमधील फ्लॅटच्या खिडकीतून ५०० रुपयांचे नोटांचे बंडल खाली फेकण्याचा प्रयत्न केला. ही घटना परिसरातील नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून, त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकजण या बंडलच्या मागे धावताना आणि काहीजण त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत. (Odisha)
Today , on the allegation of possession of disp. assets by Sri Baikuntha Nath Sarangi, Chief Engineer, RW Division, Odisha, house searches are on by #Odisha #Vigilance at 7 locations. Approx Rs 2.1 Crore cash recovered so far from his house at Bhubaneswar (1 Cr) & Angul (1.1 Cr). pic.twitter.com/j0H344OiqA
— Odisha Vigilance (@OdishaVigilance) May 30, 2025
व्हिजिलन्स विभागाच्या या कारवाईत एकूण ८ डीएसपी, १२ निरीक्षक, ६ एएसआय आणि इतर अधिकारी सहभागी होते. जप्त केलेली रक्कम इतकी मोठी आहे की, ती मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आल्या आहेत. भुवनेश्वरमधील फ्लॅटमध्ये १ कोटी आणि अंगुलमधील घरातून १.१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सध्या बैकुंठ नाथ सारंगी यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौकशी सुरू आहे. ओडिशामध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई राज्यभर चर्चेचा विषय बनली असून, सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचं चित्र आहे. (Odisha)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community