
आयपीएलच्या आडून लोकांची ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार सुरू आहे. हे थांबले पाहिजे, परंतु, कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे आपण लोकांना हत्या करण्यापासून रोखू शकत नाहीत, तसाच हा प्रकार असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या मुद्द्यावर केंद्र सरकारला नोटीस बजावून न्यायालयाने म्हणणे मागवले आहे. (Supreme Court)
हेही वाचा-सुरक्षितता आणि सोईसुविधांसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल – उपसभापती Dr. Neelam Gorhe
ऑनलाइन ॲप्सचे नियमन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर न्यायालय (Supreme Court) सुनावणी करत होते. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, “ज्याप्रमाणे आपण लोकांना खून करण्यापासून रोखू शकत नाही, त्याचप्रमाणे कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही. बेंचने सांगितले की, ते केंद्राला विचारतील की ते या विषयावर काय करत आहे. यासाठी केंद्राला नोटीस देण्यात आली आहे आणि उत्तर मागितले आहे. या प्रकरणात खंडपीठाने ॲटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरलकडून मदत मागितली आणि गरज पडल्यास सर्व राज्यांकडून नंतर उत्तरे मागवली जातील असे सांगितले. (Supreme Court)
हेही वाचा- Muhammad Yunus राजीनामा देण्याच्या तयारीत; असुरक्षित वाटत असल्याचा घेत आहेत अनुभव
याचिकाकर्ते के ए पॉल यांनी आरोप केला आहे की, अनेक ऑनलाइन प्रभावशाली कलाकार, अभिनेते आणि क्रिकेटपटू ऑनलाइन ॲप्सचा प्रचार करत आहेत आणि मुलांना आमिष दाखवत आहेत. पॉलने दावा केला की, त्यांनी गेल्या काही वर्षांत ज्या लाखो पालकांची मुले सट्टेबाजीमुळे मरण पावली आहेत, त्यांच्या वतीने याचिका दाखल केली आहे. सिगारेटच्या बाबतीत, पाकिटांवर धूम्रपानाचे दुष्परिणाम दर्शविणारे चित्र होते, परंतु बेटिंग ॲप्सच्या बाबतीत अशी कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान भारतीय संघातील माजी क्रिकेटपटूंनीही या अॅप्सचा प्रचार केला. (Supreme Court)
हेही वाचा- भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे Germany कडून समर्थन
पॉल म्हणाले, ‘ज्यांनी आपली मुले गमावली आहेत त्या लाखो माता-पित्यांची बाजू मी इथे मांडत आहे. एकट्या तेलंगणात आतापर्यंत १०२३ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. याला बॉलीवूड आणि टॉलीवूडचे २५ अभिनेते व प्रभावी लोक जबाबदार आहेत.’ पॉल यांनी दावा केला की, तेलंगणात या ॲपचा प्रचार करणाऱ्यांविरुद्ध एक एफआयआर पण दाखल करण्यात आला होता. या ऑनलाईन सट्टेबाजीमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा ॲपच्या वापरातून आलेल्या नैराश्यामुळे कित्येक मुलांनी आत्महत्या केली असल्याचे याचिकेत नमूद आहे. (Supreme Court)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community