अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याच्या प्रकरणात मंत्री Nitesh Rane यांची निर्दोष मुक्तता, न्यायालयाने काय म्हटलं?

राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांना एका प्रकरणात न्यायालयाने मोठा दिलासा आहे. सरकारी अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याच्या प्रकरणात मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, २०१७ मधील प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून २१ मे रोजी दिलेल्या निर्णयाची माहिती आता समोर आली आहे.(Nitesh Rane)

92

राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांना एका प्रकरणात न्यायालयाने मोठा दिलासा आहे. सरकारी अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याच्या प्रकरणात मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, २०१७ मधील प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून २१ मे रोजी दिलेल्या निर्णयाची माहिती आता समोर आली आहे.(Nitesh Rane)

(हेही वाचा Viral Video : “गांधी परिवारातील सगळेच २४x७ राजकारणात होते, पण तुम्ही…”; गुलाम नबी आझाद यांचा व्हिडिओ व्हायरल )

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील तत्कालीन मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रदीप वत्स यांच्या कार्यालयात नितेश राणे(Nitesh Rane) कार्यकर्त्यांसह गेले होते. तिथे त्यांना मत्स्यव्यवसायाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करायची होती. परंतु, चर्चेदरम्यान तूतू-मैमै झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आणि एक मासा फेकला. जो अधिकाऱ्याच्या तोंडावर लागला. एवढेच नाही तर कार्यकर्त्यांनी मासेमारीच्या बोटी जाळण्याची धमकीही दिली होती.

न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता का?

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, अधिकारी प्रदीप वस्त यांनी त्यांच्या साक्षीत नितेश राणे यांनी स्वतः मासे फेकल्याचे म्हटले नाही. त्यांनी फक्त एवढेच सांगितले की, राणें(Nitesh Rane)सोबत असलेल्या काही लोकांनी मासे फेकले होते. दुखापत कोणी केली हे स्पष्टपणे सांगू शकले नाहीत. न्यायालयाने म्हटले की, आरोपीने अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखले किंवा नुकसान केले हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस आणि विश्वासार्ह पुरावे नाहीत.

कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला?

या प्रकरणात, नितेश राणे(Nitesh Rane) आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणण्यासाठी हल्ला(कलम ३५३), सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत करणे(कलम ३३२), चुकीच्या पद्धतीने मार्गात अडथळा आणणे(कलम ३४१), बेकायदेशीरपणे एकत्र येणे आणि दंगल करणे(कलम १४१, १४३, १४७), जाणूनबुजून अपमान करणे(कलम ५०४), धमकी देणे(कलम ५०६) यांसारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Nitesh Rane)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.