NIA : दहशतवादी कृत्यांकरता पैसे हवेत म्हणून ‘ते’ टाकायचे दरोडे

एनआयएने यापूर्वी जुलै २०२३ मध्ये शस्त्रास्त्रे, स्फोटके, रसायने आणि इसिस संबंधित साहित्य जप्त केल्याप्रकरणी ११ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे.

194
NIA Attacked: ममतांच्या राज्यात सरकारी अधिकारी सुरक्षित नाहीत; ईडीनंतर आता एनआयएच्या पथकावर हल्ला

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) या संघटनेच्या चार दहशतवाद्यांविरुद्ध एनआयएने दुसऱ्या गुन्ह्यात पहिले पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी या संघटनेचे सदस्य दहशतवादासाठी निधी गोळा करण्यासाठी शहरात चोऱ्या, दरोडे सारखे गुन्हे करून पैसा उभा करीत असल्याची धक्कादायक बाब राष्ट्रीय तपास संस्था (NIA) च्या तपासात समोर आले आहे. (NIA)

इसिसच्या पुणे मॉड्युल शस्त्रास्त्रे आणि स्फोटके प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बुधवारी पहिले पुरवणी आरोपपत्र विशेष सत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात एनआयएने आणखी चार जणांच्या नावाचा उल्लेख केला आहे, या चार जणांविरुद्ध पुरवणी आरोपपत्रात आरोप ठेवण्यात आले आहे. एनआयएने यापूर्वी जुलै २०२३ मध्ये शस्त्रास्त्रे, स्फोटके, रसायने आणि इसिस संबंधित साहित्य जप्त केल्याप्रकरणी ११ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. बुधवारी या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे मो. शाहनवाज आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशी आहेत. एनआयएने (NIA) यापूर्वी आरोपपत्र दाखल केलेल्या सात आरोपींपैकी शामील नाचन यांच्यावर अतिरिक्त आरोप दाखल करण्यात आले आहेत. (NIA)

(हेही वाचा – Gender Inequality Index : लैंगिक असमानता निर्देशांकात भारत 193 देशांमध्ये 108 व्या क्रमांकावर)

आरोपपत्रात आहे ही माहिती 

चार आरोपीपैकी मोहम्मद शाहनवाज आलम याला पुण्यातील कोथरूड परिसरातून दुचाकी चोरी प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यातून बाहेर पडलेल्या शाहनवाज आलम याला एनआयएने २ नोव्हेंबर २०२३ मध्ये अटक केली होती. शाहनवाज आलम हा अटकेत असलेल्या आणि फरार असलेल्या इसिसच्या सदस्यांच्या संपर्कात होता, या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. मुंबईसह पुण्यात दहशतवादी कृत्याच्या कटात नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या चौघांचा सहभाग होता असे एनआयएच्या (NIA) तपासात उघड झाले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे गुप्त संवाद ॲप्सद्वारे त्यांच्या विदेशी हँडलरच्या संपर्कात होते असे तपासात उघडकीस आले, तसेच तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली दहशतवादासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी मुंबई पुण्यात अटकेत असणारे आरोपी सशस्त्र दरोडे, चोरी सारखे गंभीर गुन्हे करीत असल्याची माहिती समोर आली असल्याचे पुरवणी आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्यांचा नापाक मनसुबा पार पाडण्यासाठी त्यांच्या हस्तकांकडून पैसेही मिळवत होते अशी माहिती आरोपपत्रात केली आहे. (NIA)

अटकेत असलेल्या आरोपींनी पुण्यातील कोंढवा येथे आयईडी तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि प्रात्यक्षिके स्फोटही घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध मेट्रो शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणांच्या रेकी करण्याबरोबरच स्फोट घडवून आणल्यानंतर लपून बसण्यासाठी संभाव्य ठिकाणांसाठी पश्चिम घाटातील क्षेत्राची रेकी केली होती. एनआयएच्या (NIA) निष्कर्षांनुसार, दहशतवादी हल्ल्यांसाठी स्वत:ला तयार करताना आरोपींनी गोळीबाराचा सरावही केला होता. तपासादरम्यान, एनआयएने (NIA) आरोपींनी त्यांच्या आयईडी फॅब्रिकेशन प्रशिक्षणाच्या वेळी घेतलेल्या हस्तलिखित नोट्स जप्त केल्या होत्या. इसिसच्या खलिफाच्या नावाने घेतलेले ‘बयथ’ (प्रतिज्ञा) दरम्यान वापरलेले ड्रोन, कपडे आणि चाकूही जप्त करण्यात आला आहे. शमिल नाचनाशिवाय, मूळ आरोपपत्रात मो. इम्रान, मो. युनूस साकी, कादिर दस्तगीर पठाण, सीमाब काझी, झुल्फिकार अली बडोदावाला आणि अकीफ नाचन यांचा समावेश आहे. याप्रकरणी एनआयएचा (NIA) तपास सुरू आहे. (NIA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.