टीव्ही पत्रकार भासविणाऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या हनीट्रॅपमध्ये अडकला जवान; NIA चौकशीत नवनवीन माहिती उघड

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सीआरपीएफ एएसआय मोतीराम जाटच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) चौकशीत अनेक नवीन गोष्टी सापडल्या आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्याने टीव्ही पत्रकार असल्याचे भासवत सीआरपीएफ जवानाकडून संवेदनशील माहिती मिळविल्याचे आढळून आले होते. याप्रकरणात चौकशी करताना NIA ला नवनवीन माहिती तपासात मिळाली आहे.

57

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सीआरपीएफ एएसआय मोतीराम जाटच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) चौकशीत अनेक नवीन गोष्टी सापडल्या आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्याने टीव्ही पत्रकार असल्याचे भासवत सीआरपीएफ जवानाकडून संवेदनशील माहिती मिळविल्याचे आढळून आले होते. याप्रकरणात चौकशी करताना NIA ला नवनवीन माहिती तपासात मिळाली आहे.

(हेही वाचा Bihar Assembly Election : निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार यांचा मास्टरस्ट्रोक; एनडीए सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय )

दरम्यान, एनआयए(NIA) चौकशीत सीआरपीएफ जवानाचा फोनही तपासण्यात आला होता. यात जवानाने कोणतेही मेसेज डिलीट केलेले नसल्याचे आढळून आले. परंतु, मोतीरामने सुरक्षा एजन्सींच्या हालचालींच्या काही बातम्यांच्या क्लिपिंग्ज शेअर केल्याचे देखील आढळून आले. दहशतवादी हल्ल्याच्या पाच दिवसांआधीच पहलगाममधून बदली झाली होती. ३,५००-१२ हजार रुपये देऊन सीआरपीएफ जवानाकडून संवेदनशील माहिती मिळविली जात असे.

(हेही वाचा  )भारत-नेपाळ सीमेवर China मुले बनवत होते व्हिडिओ; फोनमध्ये आढळला खलिस्तानी मजकूर

महत्त्वाचे म्हणजे हनीट्रॅपमध्ये अडकलेला एएसआय मोतीराम जाट गेल्या २ वर्षांपासून भारताची अनेक संवेदनशील माहिती शेअर करत होता. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने पत्रकार असल्याचे भासवून सीआरपीएफ जवानाकडून भारतासंदर्भातील अनेक महत्त्वाची माहिती घेतली होती.

टीव्ही पत्रकार असल्याचे भासवून जवानाला अडकविले

माध्यमांच्या माहितीनुसार, एक पाकिस्तानी महिला स्वतःला चंदीगडमधील टीव्ही पत्रकार असल्याचे सांगून सीआरपीएफ जवानाच्या संपर्कात आली होती. तिने जवानाला काही माहिती शेअर करण्याची विनंती केली. त्यानंतर जवळीक वाढवण्यासाठी ती मेसेज, कॉल आणि व्हिडिओ कॉल देखील करत महिला जवानाच्या सतत संपर्कात राहिली.

त्यानंतर सीआरपीएफ जवान असलेल्या मोतीरामने महिलेसोबत अनेक संवेदनशील माहिती शेअर करण्यास सुरुवात केली. दोन ते तीन महिने बोलल्यानंतर त्या महिलेने त्याचा संपर्क दुसऱ्या व्यक्तीशी करून दिला. जो त्याच वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याचा दावा करत होता. प्रत्यक्षात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी होता, असे तपासाअंती निष्पन्न झाले.

पहलगाम हल्ल्यानंतरही दिली माहिती

वृत्तानुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही मोतीरामने पाकिस्तानी गुप्तहेरांना अनेक माहिती दिली होती. पाकिस्तानी अधिकाऱ्याने पत्रकार म्हणून ओळख असलेल्या अधिकाऱ्याने त्याला दरमहा ३,५०० रुपये आणि कोणत्याही महत्त्वाच्या माहितीसाठी १२ हजार रुपये अतिरिक्त दिले. त्याने हे पैसे त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केल्याचे तपासात आढळून आले. जवानाने शेअर केलेल्या माहितीमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांचा काश्मीर दौरा, सीआरपीएफ जवानांच्या हालचालींची संख्या, दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची माहिती आणि ५० पर्यटन स्थळे बंद करण्याची माहिती याचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.