NewsClick : चिनी निधीच्या प्रकरणी न्यूजक्लिकचे प्रबीर पुरकायस्थ, अभिसार शर्मा, भाषा सिंह, सीताराम येचुरी आणि तीस्ता सेटलवाड यांच्या घरांवर छापे; तपासात काय सापडले

79
NewsClick : न्यूजक्लिकचे प्रबीर पुरकायस्थ, अभिसार शर्मा, भाषा सिंह आणि तीस्ता सेटलवाड यांच्या घरांवर छापे; तपासात काय सापडले
NewsClick : न्यूजक्लिकचे प्रबीर पुरकायस्थ, अभिसार शर्मा, भाषा सिंह आणि तीस्ता सेटलवाड यांच्या घरांवर छापे; तपासात काय सापडले

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने न्यूज क्लिकच्या कार्यालयावर छापा टाकून सर्व मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत. (NewsClick) दिल्ली पोलिसांनी न्यूज क्लिकचे सीईओ प्रबीर पुरकायस्थ, अभिसार शर्मा, भाषा सिंह, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी आणि तीस्ता सेटलवाड यांच्यासह अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले आहेत. यातील काही पत्रकारांनाही पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी पोलिसांनी त्यांचे लॅपटॉप आणि फोन जप्त केले. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक या ऑनलाइन पोर्टलशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले होते. न्यूजक्लिक या पोर्टलला चीनकडून अनेक कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे अन्वेषण यंत्रणांना आढळून आले आहे. न्यूजक्लिक 2021 पासून बेकायदेशीर परदेशी निधीसाठी स्कॅनरखाली आहे. त्या वेळी अभिसार शर्मा हेदेखील या पोर्टलसाठी काम करत होते. देशाच्या संसदेच्या अधिवेशनात भाजप आणि काँग्रेसमध्ये यावरून जोरदार चर्चा झाली होती. (NewsClick)

(हेही वाचा – Baby Crocodile In Swimming Pool : दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात सापडले मगरीचे पिल्लू)

अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे की, न्यूजक्लिकला अमेरिकास्थित कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. तीन वर्षांच्या कालावधीत न्यूजक्लिकमध्ये 38.05 कोटी रुपयांचा परदेशी निधी आढळून आला आहे. हे प्रकरण गौतम नवलखा आणि तिस्ता सेटलवाड यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक वादग्रस्त पत्रकारांपर्यंत पोहोचले आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार, दिल्ली NCR परिसरात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पीपीके न्यूजक्लिक स्टुडिओ, त्याच्या संलग्न संस्था, तसेच संचालक आणि भागधारक (१० संस्थांचा समावेश असलेल्या) यांच्या परिसरात कसून शोध घेतला. या वेळी परकीय चलन, गैरव्यवहार दर्शविणारी कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. (NewsClick)

न्यूजक्लिक घोटाळ्याच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी छापा टाकलेल्या ठिकाणांपैकी एक टेलिव्हिजन पत्रकार यूट्यूबर अभिसार शर्माचा होता. अभिसार शर्माने याविषयी ट्विटरवर माहिती दिली की, दिल्ली पोलिस त्यांच्या निवासस्थानी आले आहेत आणि त्यांचा लॅपटॉप आणि फोन जप्त करत आहेत. अनेक लोकांवर छापे टाकण्यात आले आहेत – ते सर्व न्यूजक्लिकशी जोडलेले आहेत. (NewsClick)

“पोलिसांनी आज सकाळी संजय राजौरा, भाषा सिंग, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, अभिसार शर्मा, अनिंद्यो चक्रवर्ती आणि सोहेल हाश्मी यांच्या निवासस्थानावर छापे टाकले. फोन आणि लॅपटॉप घेतले. काहींना पोलीस ठाण्यात नेले. ते सर्व न्यूजक्लिकशी संबंधित आहेत”, एका पत्रकाराने ट्विट केले. (NewsClick)
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.