अतिक अहमद प्रकरणात नाशिकमधून गुड्डू मुस्लिम किंवा अन्य कोणालाही अटक झालेली नाही, पोलिसांची माहिती

60

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी सायंकाळी माफिया आणि बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही भावांच्या एकाच वेळी झालेल्या हत्येने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. अहमद भावांच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांच्या STF (स्पेशल टास्क फोर्स) पथकाला नाशिकमध्ये याचे धागेदोरे सापडले. नाशिकमधून दोघांजणांचा ताब्यात घेतले. गुड्डू मुस्लिम आणि शिव दिवाकर असे दोघांजणांचे नाव होते. या दोघांना अटक झाल्याचे म्हटले जात होते. मात्र या दोघांचा अटक झाली नसून फक्त चौकशी केल्याची माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी माध्यमांना दिली आहे.

अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली म्हणाले की, ‘शनिवार दिल्ली पोलिसांचे STF पथक नाशिकमध्ये येऊन चौकशी करून गेले. ते आर्म ॲक्टच्या चौकशीसाठी नाशिकमध्ये आले होते. जाताना त्यांनी गुड्डू मुस्लिम किंवा अन्य कोणालाही सोबत नेले नाही.’

कोण आहे गुड्डू मुस्लिम ?

अतिक, त्याचा भाऊ अशरफ आणि मुलगा असद यांच्याप्रमाणेच गुड्डू मुस्लिम हा देखील उमेश पाल खून प्रकरणात आरोपी आहे. गुड्डू मुस्लिम हा उत्तर प्रदेशातील मोस्ट वाँटेड हल्लेखोर आहे. उमेश पाल हत्येमध्ये सहभागी असलेला अतिक अहमदचा मेहुणा अखलाव अहमद याने गुड्डू मुस्लिमला आश्रय दिला होता. गुड्डू मुस्लिमचा अलाहाबादमध्ये मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. तो क्रूड बॉम्ब बनवायचा आणि त्याला गुड्डू बंबाज म्हणूनही ओळखले जाते. उमेश पाल खून प्रकरणात उमेश पाल यांच्यावर दुचाकीवरून बॉम्ब फेकणारा व्यक्ती होता गुड्डू मुस्लिम. अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याने पूर्वी गुड्डूने उत्तर प्रदेशातून पळ काढला होता कारण तो पोलिसांना आधीच हवा होता. तो बिहारला पळून गेला होता पण त्याला २००१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर अतिक अहमदने त्याला तुरुंगातून बाहेर काढले आणि आणि त्या दोघांचे संबंध घनिष्ट झाले, असे मानले जाते. उमेश पाल खून प्रकरणात गुड्डूचे नाव पुन्हा समोर आले आणि पोलिसांनी गुड्डू मुस्लिमवर ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.

कोण आहे शिव दिवाकर?

शिव दिवाकर नाशिक मधील अंबड एमआयडीसी परिसरात एका हॉटेलमध्ये कामाला आहे. दिवाकर सांगितले की, त्याच्या मोबाईलवर एक अज्ञात कॉल आला. कॉल उचलताच समोरील व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व पुन्हा या नंबर वर फोन न करण्याची धमकी देखील दिली. हा फोन झाल्याच्या काही तासात दिल्लीहून पोलिसांचे STF पथक नाशिकमध्ये दाखल झाले व दिवाकर ज्या हॉटेलमध्ये काम करतात तेथे पोहोचले. यावेळी हॉटेल चालकाने स्थानिक पोलिसांना देखील याविषयी माहिती दिली. STF पथकाने दिवाकर याला चौकशीसाठी अंबड पोलीस स्टेशन येथे आणले. त्यानंतर त्याला आलेला फोन कुठून कोणाचा होता, त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का याविषयी सखोल विचारणा करून तब्बल दोन ते तीन तासांच्या चौकशीनंतर दिवाकरला पुन्हा त्यांच्या हॉटेलवर सोडून देण्यात आले. यानंतर दिल्ली STF पथक मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.

(हेही वाचा – कुख्यात गँगस्टर अतिक अहमद हत्या : पोलिसांचे निलंबन, प्रयागराजमध्ये इंटरनेट सेवा बंद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.