National Herald Case : “गांधी कुटुंबाने आर्थिक गैरव्यवहारातून १४२ कोटी कमविले”; ईडीचा न्यायालयात मोठा दावा

National Herald Case :  नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने गांधी कुटुंबाविरोधात दिल्लीतील राऊस न्यायालयात मोठा दावा केला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आर्थिक अफरातफरीतून १४२ कोटी रुपये मिळविल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले.

114

National Herald Case :  नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने गांधी कुटुंबाविरोधात दिल्लीतील राऊस न्यायालयात मोठा दावा केला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आर्थिक अफरातफरीतून १४२ कोटी रुपये मिळविल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. ईडीने न्यायालयात म्हटले की, नॅशनल हेराल्ड(National Herald Case) मनी लाँड्रिंग प्रकरणात गांधी कुटुंबियांनी आर्थिक गैरव्यवहारातून १४२ कोटी रुपये मिळविले.

(हेही वाचा रामपूरमधील तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण; ‘ATS’ने देखरेखीनंतर पकडलेल्या हेराबाबत धक्कादायक माहिती उघड )

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा ‘प्रथमदर्शनी’ खटला सुरू असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने असोसिएटेड जर्नल लिमिटेडच्या समभागांशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केले. न्यायालय म्हणाले, कंपनीचे समभागधारक मालमत्तेचे मालक आहेत की नाही?. ईडीच्या विशेष वकिलांनी काँग्रेस पक्षाच्या देणगीदारांची फसवणूक झाल्याचे सांगतानाच त्यांनी पक्षाला देणगी दिली. पदाधिकाऱ्यांनी व्यावसायिक उपक्रमात कार्यरत असलेल्या कंपनीला कर्ज दिल्याचे ईडीने न्यायालयात म्हटले.

नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय?

नॅशनल हेराल्ड(National Herald Case) वृत्तापत्राच्या अधिग्रहणासंदर्भात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ साली एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून सत्र न्यायालयाने आयकर विभागाला नॅशनल हेराल्डप्रकरणी(National Herald Case) गांधी कुटुंबाची चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली. दि. ११ एप्रिल २०२५ रोजी ईडीने ६६१ कोटींची मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आता गांधी कुटुंबाविरोधात १४२ कोटींच्या आर्थिक अफरातफरीचे ईडीने दावा केला आहे.(National Herald Case)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.