Nagpur Police : पोलिसांची धडक कारवाई; ३६ लाखांच्या ड्रग्जसह महिलेला अटक

59
Nagpur Police : पोलिसांची धडक कारवाई; ३६ लाखांच्या ड्रग्जसह महिलेला अटक

नागपुरातील जरीपटका पोलिसांनी (Nagpur Police) स्थानिक मिसाळ ले-आऊट परिसरातून एका महिलेला ३६ लाख २८ हजार रुपयांच्या अंमलीपदार्थांसह अटक केली आहे. या महिलेने अंमलीपदार्थ कुठून आणले आणि ती ते कुणाला देणार होती, याबाबत तिने मौन बाळगले आहे.

अधिक माहितीनुसार, आरोपी महिला ही ३५ वर्षांची असून ती मागील अनेक वर्षांपासून अंमलीपदार्थ (Nagpur Police) तस्करीत गुंतलेली आहे. त्यामुळेच ती दरवेळी आपला राहता पत्ता बदलत असते. तिचे ठरलेले ग्राहक आहेत. काही दिवसांपूर्वी ही आरोपी महिला आपल्या मैत्रिणींकडून देहव्यापार करवून घेत होती. तिच्या घरात आंबटशौकीन ग्राहकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून अलिकडेच तिच्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. सदर महिला एमडी तस्करीत सक्रीय असल्याची माहिती देखील पोलिसांना (Nagpur Police) मिळाली होती. ती माहिती खात्रीलायक असल्याने पोलिसांनी त्या महिलेच्या घराभोवती सापळा रचला आणि धाड टाकली.

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराची झळ थेट मुख्यमंत्र्यांनाही; CM बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला)

तिच्या घराची झडती (Nagpur Police) घेतली असता किचन रुममधील एका डब्यात ३६ लाख २८ हजार रुपये किंमतीचे ३६५ ग्रॅम एमडी पावर आढळून आले. पोलिसांनी सध्या तिच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपी महिलेला न्यायालयात उपस्थित केले. या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने आरोपी महिलेला पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या (Nagpur Police) अधिक माहितीनुसार, आरोपी महिला आपल्या तब्येतीचे कारण सांगून तपासात आम्हाला सहकार्य करत नाही. मात्र तिचा मोबाईल आम्ही जप्त केला आहे. त्या मोबाईलमधून अनेक गोष्टी समोर येतील असे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.