पहलगाम हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट Vinay Narwal यांच्या पत्नीचा धर्मांध मुसलमान मोहिबुल हक आणि गुलाम जिलानीने AI द्वारे केला अश्लील व्हिडीओ

या धर्मांध मुसलमानांनी इतर अनेक लोकांचेही असे अश्लील व्हिडिओ बनवले आहेत.

162

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट Vinay Narwal यांच्या पत्नीचा AI चा वापर करत अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला आहे. धर्मांध मुसलमान मोहिबुल हक आणि गुलाम जिलानी यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. या प्रकरणी बिहार आणि हरियाणा पोलिसांनी गोपाळगंज येथून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघेही मांझा पोलीस स्टेशन परिसरातील धोबवालिया गावातील रहिवासी आहेत. या दोघांनी एआयच्या मदतीने विनय नरवाल (Vinay Narwal) यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांचा अश्लील व्हिडिओ बनवला होता आणि तो एसएस रिअल पॉइंट नावाच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला होता.

(हेही वाचा भारतात सुमारे ४४ टक्के शस्त्रक्रिया होतात बोगस; काय आहे Medical क्षेत्रातील गोरख धंदा?)

व्हिडिओचा स्रोत आणि स्थान शोधल्यानंतर, पोलिसांनी दोघांनाही मांझा पोलीस स्टेशन परिसरातून अटक केली. दोघांचे लॅपटॉप आणि मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. चौकशी दरम्यान, असे आढळून आले की त्यांनी इतर अनेक लोकांचेही असे व्हिडिओ बनवले आहेत. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले, तेथून हरियाणा पोलिसांनी त्यांना ट्रान्झिट रिमांडवर गुरुग्रामला नेले. (Vinay Narwal)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.