Murshidabad Violence : तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकाचा हिंसाचारात सहभाग, न्यायालयीन समितीच्या अहवालात गंभीर खुलासे

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद(Murshidabad Violence) येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या संदर्भात नवीन खुलासे समोर आले आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने धक्कादायक खुलासे केले असून तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हिंसाचारा(Murshidabad Violence)त भूमिका असल्याचे आढळून आले आहे.

108

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद(Murshidabad Violence) येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या संदर्भात नवीन खुलासे समोर आले आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने धक्कादायक खुलासे केले असून तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हिंसाचारा(Murshidabad Violence)त भूमिका असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, सत्ताधारी ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक मेहबूब आलम यांनी हा हल्ला केल्याचा गंभीर खुलासा चौकशी समितीने केला आहे.

(हेही वाचा Uttar Pradesh : “२२५ मदरसे, ३० मशिदी…”; बेकायदा बांधकामांवर योगी सरकारची बुलडोझर कारवाई )

महत्त्वाचे म्हणजे मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी दि. १७ एप्रिल रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोग आणि राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणातील प्रत्येकी एक सदस्याचा समावेश करण्यात आला होता. या समितीने हिंसाचारासंदर्भात सविस्तर माहिती देत महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

(हेही वाचा Jyoti Malhotra च्या डायरीत धक्कादायक खुलासे आले समोर, म्हणाली, ‘पाकिस्तान सरकारला माझी विनंती… )

चौकशी समितीच्या अहवालानुसार, मुर्शिदाबाद हिंसाचारात विशेष करून हिंदू समुदायाला लक्ष्य करण्यात आले. या काळात स्थानिक पोलीस पूर्णपणे निष्क्रिय राहिले असून पीडितांनी अनेकवेळा पोलिसांना फोन केल्याचेही समितीने नमूद केले. अहवालात असेही म्हटले आहे की, हिंसाचारात कोणतीही मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे दि. ११-१२ एप्रिल रोजी नवीन वक्फ बोर्ड कायद्याविरोधातील निदर्शनावेळी संतप्त जमावाने हिंसाचार केला होता. याच मुर्शिदाबाद हिंसाचारा(Murshidabad Violence)त तीन जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते.

उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालातील ०४ गंभीर मुद्दे : –

मुख्य हल्ला शुक्रवार, ११ एप्रिल रोजी दुपारी २:३० नंतर झाला.

नगरसेवक मेहबूब आलम हे समाजकंटकासह आले होते. त्यानंतर हिंसाचार झाला.

बेटबोना गावातील ११३ घरांचे सर्वाधिक नुकसान झाले

अचानक जाळपोळ, लूटमार झाली, दुकाने आणि मॉल्सना लक्ष्य करण्यात आले.

हिंसाचार प्रकरणात १०० हून अधिक एफआयआर दाखल, २७६ जणांना अटक

पश्चिम बंगाल पोलिसांच्या एसआयटीने दि. २१ एप्रिल रोजी हिंसाचार(Murshidabad Violence) प्रकरणात ओडिशाच्या झारसुगुडा येथून १६ जणांना अटक केली होती. ते सर्वजण झारसुगुडा येथे लपून बसले होते. पोलिसांनी हिंसाचाराचा सूत्रधार झियाउल हक याला त्याच्या दोन्ही मुलांसह अटक केली असून त्यांच्यावर हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे. या प्रकरणी, पश्चिम बंगाल पोलिस एसटीएफ आणि एसआयटीने संयुक्तपणे ही कारवाई केली असून अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर रेकॉर्ड जप्त केले.(Murshidabad Violence)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.