-
प्रतिनिधी
दोन मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याची घटना अंधेरी पूर्व येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ३७ वर्षीय मुलगी व तिच्या प्रियकर महेश पांडे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. (Murder)
(हेही वाचा – Indus Water Treaty : मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत; पाकिस्तानविरोधात जल रणनीती तयार?)
शंकर कांबळे (५८) असे हत्या करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे. शंकर कांबळे हे घाटकोपर पश्चिम भटवाडी येथे मुलगा राहुल सोबत राहण्यास होते. शंकर यांची मोठ्या मुलीचे लग्न झाले असून तिला पतीपासून दोन १७ आणि १३ वर्षांची दोन मुले असून ती पती आणि मुलांसह घाटकोपर परिसरातच राहण्यास होती. शंकर हे अंधेरी पूर्व मरोळ येथे एका कंपनीत सफाई कामगार म्हणून कामाला होते. त्यांची मोठी मुलगी हिचे महेश पांडे सोबत मागील तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते, व ती पती आणि मुलांना सोडून महेश पांडे सोबत राहत होती. वडिल शंकर यांना मुलीचे महेश पांडे सोबत राहणे आवडत नसल्याने त्यांच्यात वाद होत होता. (Murder)
(हेही वाचा – Heavy Rain : मुसळधार पावसाने राज्याला झोडपले)
गेल्या आठवड्यात शंकर यांची मोठी मुलगी आणि तिचा प्रियकर हे शंकर यांच्या कामाच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ५८ वर्षाचे शंकर यांना मारहाण केली. दरम्यान मुलगा राहुल याने चिराग नगर (घाटकोपर) पोलीस ठाण्यात बहीण आणि तिच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी महेश पांडेसह दोघांना समजावून पाठवले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शंकर यांची मोठी मुलगी आणि तिचा प्रियकर पांडे हे दोघे पुन्हा शंकर यांच्या कामाच्या ठिकाणी अंधेरी येथे गेले आणि त्या ठिकाणी शंकर यांना बाहेर बोलावून मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शंकर कांबळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ३७ वर्षीय मुलगी व तिच्या प्रियकर महेश पांडे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. (Murder)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community