-
प्रतिनिधी
शाळेच्या विश्वस्ताकडून ३ लाख रुपयांची लाच (Bribe) मागून एक लाख रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना गोवंडीतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव देशमुख यांना अटक करण्यात आली. शाळेला पोलीस मदत आणि कायदेशीर प्रकरणात मदत करण्यासाठी मागण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री ही कारवाई शिवाजी नगर पोलीस ठाण्यातच केली आहे. देशमुख यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा – Virat Kohli Retirement : ३३ वर्ष विराट, सचिनने सांभाळलेली क्रमांक ४ ची जागा आता कोण घेणार?)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील तक्रारदार हे गोवंडी शिवाजी नगर परिसरातील एका शाळेचे विश्वस्त आहेत. शाळेच्या मालमत्ते संबधीत विश्वस्त आणि एका गटात वाद सुरू आहे. या गटाने शाळेच्या गेटचे कुलूप तोडले आणि बळजबरीने शाळेच्या परिसरात प्रवेश केला होता. विश्वस्तांनी तक्रार दाखल करण्यासाठी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात संपर्क साधला होता आणि धर्मादाय आयुक्तांनाही हे प्रकरण सादर केले होते. पुढील घुसखोरी रोखण्यासाठी आणि धर्मादाय आयुक्त अंतिम आदेश देईपर्यंत शाळेचे रक्षण करण्यासाठी अधिकृत पोलिस मदत मागण्यासाठी, विश्वस्ताने निरीक्षक देशमुख यांच्याशी संपर्क साधला.
(हेही वाचा – Street Dog पाक सीमेवरून दहशतवाद्यांची होणारी घुसखोरी रोखतात; काय आहे प्रकरण? )
तथापि, कायदेशीर पोलिस मदत देण्याऐवजी, देशमुख यांनी पोलिस संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आणि विरोधी गटाला परिसरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच (Bribe) मागितली. वाटाघाटींनंतर, लाचेची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. कायदेशीर सेवांसाठी पैसे देण्यास तयार नसल्याने, विश्वस्ताने एसीबीकडे संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. पडताळणी प्रक्रियेनंतर, एसीबीने सापळा रचला आणि मंगळवारी रात्री देशमुखला त्याच्या कार्यालयात १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पकडले. देशमुख हे वर्ग १ चे अधिकारी असून त्यांच्या निवृत्तीला फक्त एक वर्ष शिल्लक आहे. त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई एसीबीचे अतिरिक्त आयुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त डीसीपी अनिल घेरडीकर आणि राजेंद्र सांगळे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community