Mumbai Police : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची सहकाऱ्यांसह काढली धिंड; नेमकं प्रकरण काय?

48
Mumbai Police : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची सहकाऱ्यांसह काढली धिंड; नेमकं प्रकरण काय?
  • प्रतिनिधी 

एका महिलेच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या शहीद रहीम शेख हा जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांकडून तुरुंगाबाहेर येताच त्याचे स्वागत करत एका कारमधून मिरवणूक काढण्यात आली होती. मोटारीतून निघालेल्या मिरवणुकीत शहीद आणि त्याचे सहकारी रस्त्यात स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेऊन शहीद रहीम याच्यासह त्याच्या सात-आठ सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याच परिसरातून धिंड काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. (Mumbai Police)

(हेही वाचा – Iran – Israel War मुळे अखेर इराणमध्ये सत्ता परिवर्तनाचे वारे; ‘या’ व्यक्तीने इस्राईल हल्ल्याचे समर्थन करत देशाचे नेतृत्व करण्याची दाखवली तयारी)

ठाण्यातील तुरुंगातून बाहेर पडलेल्या गुंडाला त्याचे सहकारी स्वागत करून त्याला एका लाल रंगाचा कारमध्ये बसवतात, त्यानंतर ती कार आणि कारच्या मागे दहा ते बारा बाईकस्वार विना हेल्मेट निघाले. कारमध्ये बसलेली व्यक्ती धावत्या कारच्या खिडकीतून आपले अर्धे शरीर बाहेर काढून स्टंट करीत आहे. त्याच्या मागे मोटारसायकलीचा ताफा, या व्हिडीओला “सरकार राज” चित्रपटातील “गोविंदा आला रे” या गाण्याची जोड होती. हा स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ठाणे पोलिसांच्या परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेऊन वागळे इस्टेट पोलिसांना कारवाईचा आदेश दिला. (Mumbai Police)

(हेही वाचा – India Tour of England : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडला परतला; काय आहे संघात वातावरण?)

वागळे इस्टेट पोलिसांनी तुरुंगातून जामिनावर बाहेर पडलेला शहीद रहीम शेख याला त्याचे सहकारी तौसिफ शेख, इर्शाद शेख, समीर शेख, सरफराज शेख, साजिद शेख आणि इर्शाद यांना वागळे इस्टेट इंदिरा नगर येथून ताब्यात घेऊन वागळे इस्टेट पोलीस ठाण्यापर्यत त्यांची धिंड काढण्यात आली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) : कलम १८९(२), १९०, २७०, २८१ आणि २८५, मोटार वाहन कायदा : कलम १८४, महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ : कलम ३७(१)(३) आणि १३५ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवामुळे स्थानिक गुंडामध्ये दहशत निर्माण झाली असली तरी सामान्यांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.