-
प्रतिनिधी
मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात माजी पोलीस अधिकारी तसेच हॉकीस्टिक मॅन म्हणून ओळख असणारे वसंत ढोबळे यांच्या एकेकाळी गाजवलेल्या मुंबई पोलीस दलाची समाजसेवा शाखा बंद करण्याचे संकेत नवनिर्वाचित मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी बुधवारी घेतलेल्या गुन्हे परिषदेत दिले. या गुन्हे परिषदेत मुंबईतील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते. देवेन भारती यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पहिलीच गुन्हे परिषद आयोजित केली होती. या गुन्हे परिषदेत आयुक्त भारती यांनी पोलिसिंग कडक करण्याची, शिस्त वाढवण्याची आणि मुंबई पोलिस दलावरील जनतेचा उडालेला विश्वास पुनर्संचयित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या अख्यत्यारीत येणाऱ्या सीबी कंट्रोल युनिट पुन्हा गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
(हेही वाचा – ‘मातोश्रीतला नरक’ हे वेगळं पुस्तक होईल’; संजय राऊतांच्या पुस्तकावर मंत्री Nitesh Rane यांची बोचरी टीका)
मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाच्या आयुक्तपदी देवेन भारती यांची गेल्या महिन्यात नियुक्ती करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडून ३० एप्रिल रोजी भारती यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. मुंबई पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेन भारती यांनी ४ जुन रोजी मुंबईतील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे परिषद (क्राईम कॉन्फरन्स) मुंबई पोलीस (Mumbai Police) मुख्यालयात आयोजीत केली होती. या गुन्हे परिषदेत मुंबईतील ९३ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक आणि सहपोलिस आयुक्तापासून पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित होते.
(हेही वाचा – “राज-उद्धव युतीचं दार उघडतंय का?, ‘मिडियात नाही, दोघा भावांनी समोरासमोर बोलावं!’; Amit Thackeray यांचे सूचक विधान)
पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या रडारवर असलेली समाजसेवा शाखेला सर्वात प्रथम धारेवर धरण्यात आले. बियरबार, जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करणाऱ्या समाजसेवा शाखेकडून बार आणि जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे अधिकार काढून घेत स्थानिक पोलिसांना बेकायदेशीर बियर बार आणि जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. समाजसेवा शाखेकडून हे अधिकार काढण्यामागे पोलीस आयुक्त यांच्याकडून समाजसेवा शाखा बंद करण्याचे संकेत असल्याची चर्चा मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात सुरू आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेली सीबी कंट्रोल युनिट काढून पुन्हा गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. तसेच, आयुक्त भारती यांनी बेकायदेशीर पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community