Fraud : मुंबई पोलिसांकडून दिल्ली येथील बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त

47
Fraud : मुंबई पोलिसांकडून दिल्ली येथील बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त
  • प्रतिनिधी

क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील एका कॉल सेंटरचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतील सायन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सायन पोलिसांच्या पथकाने दिल्लीतील एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून कॉल सेंटर चालकासह ११ जणांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. (Fraud)

(हेही वाचा – Sharmistha Panoli : हिंदूंना आपल्याच देशात सहन करावा लागतोय अन्याय!)

मुंबईतील सायन पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०२४ मध्ये सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तक्रारदारांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने अॅक्सिक्स बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याच्या नावाखाली तक्रारदारांकडून क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती घेऊन क्रेडिट कार्डमधून साडेचार लाख रुपयांची रोकड काढून फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा तपास सायन पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी सपोनि. दत्तात्रय खाडे, मंगेश खामकर आणि पथकाकडून सुरू होता. (Fraud)

(हेही वाचा – Cabinet Meeting : मुंबई प्रवेश टोलमाफी आता २०२९ पर्यंत वाढविली; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय)

तपासात हा कॉल दिल्लीतून आला असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून आरोपीच्या शोधात पथक दिल्ली येथे रवाना झाले. दिल्ली येथे इंटरनेटी इंटलेक्शन कॉल सेंटरच्या एका खोलीत सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरमध्ये छापा टाकून मनजीत कुमार महावीर सिंगसह ११ जणांना ताब्यात घेऊन आठ मोबाईल फोन आणि आठ सिम कार्ड्स जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मनजीत कुमार याला अटक करण्यात आली असून इतरांना नोटीस देऊन सोडण्यात आले असल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली आहे. ही टोळी दिल्ली येथे बोगस कॉल सेंटर चालवून विविध बँकांतून बोलत असल्याचा कॉल ग्राहकांना करून त्यांना क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करीत होती अशी माहिती परिमंडळ ४च्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी दिली. (Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.