Mumbai Drug Cartel: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ७ ब्रिटीश नागरिकांना अटक

104

Mumbai Drug Cartel : राज्यांसह देशभरात मागील काही दिवसांपासून अंमली पदार्थ तस्करीच्या (Drug Smuggling) घटना वाढत आहेत. यातच गैर आणि छुप्या मार्गाने मिळणाऱ्या अंमली पदार्थांमुळे तरुणांमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुंबईत अंमली पदार्थ जप्त (Mumbai Drugs seized Case) करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेल समोर आणत सात जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५.०२ किलो कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ५२ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. (Mumbai Drug Cartel)

(हेही वाचा – WTC Final : कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचं पारडं जड )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांमध्ये एक ब्रिटिश नागरिकाचा समावेश आहे. तो या रॅकेटचा प्रमुख असून त्याने मोझांबिक मार्गे भारतात ड्रग्जची तस्करी केली होती. अटकेत असलेल्यांमध्ये ब्रिटिश नागरिकासह बांगलादेशींचाही यामध्ये समावेश आहे.

५२ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
“गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, आमच्या पथकाने २८ मे रोजी लंडनमधील केन्सिंग्टन येथील दे वेरे गार्डन्स येथे राहणाल कुलदीप सिंग हरजीत सिंग गोजारा (Kuldeep Singh Harjit Singh Gojara) याला अटक केली होती. तो ट्रॉली बॅग घेऊन जात होता आणि जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा, आमच्या पथकाला त्यात ५.०२ किलो कोकेन आढळले, ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ५२ कोटी रुपये आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

गोजाराला जोगेश्वरी पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले जिथे तो ड्रग्जचे कंसाईनमेंट पोहोचवण्यासाठी आला होता. तो मूळचा पंजाबचा असून लंडनमध्ये स्थायिक झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. गोजाराला अटक केल्यानंतर त्याच्याशी संबंधित लोकांचा शोध घेण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने चौकशी सुरू केली होती. गोजराकडे केलेल्या चौकशीनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने शेख मोहम्मद आरिफ उद्दिन याला अटक केली. शेख मोहम्मद पूर्व आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये राहतो आणि तो बांगलादेशी नागरिक आहे.

(हेही वाचा – PM Modi Canada Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅनडा दौऱ्यापूर्वीच खलिस्तानी दहशतवाद्यांचा सुपडा साफ होणार; अमेरिका सुरू करणार मोहीम)

“आम्ही दीव बेटावरील महेंद्र प्रेजीलाही अटक केली. यांच्यासह आमच्या पथकाने अब्दुल समद अफझल मेमन, परवेझ अफाक आणि ऋषभ एद्रिस यांनाही अटक केली, असं पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून हवाला पेमेंटशी संबंधित विविध कोड देखील जप्त केले आहेत ज्यांचा तपास सुरू आहे. “तपासात समोर आलं की, आरोपींनी मोझांबिक आणि दुबईला अनेक वेळा भेट दिली. आमची चौकशी प्राथमिक टप्प्यात आहे आणि जप्त केलेल्या ड्रग्जची (Drug) किंमत सुमारे ५२ कोटी आहे,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.