मुंबईतील (Mumbai Crime) सोनाराना बनावट सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात बनावट सोन्याचे नाणे देऊन कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या दोन जणांना डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल रौफ मुसा घामेरिया (५२) आणि पमेश सुरेंद्र खिमावत (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. या आरोपींनी एका ज्वेलरला खऱ्या सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात बनावट सोन्याची नाणी विकून २.३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोप आहे. (Mumbai Crime)
डोंगरी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार नरेंद्र लाधुरामजी सोनी (४८) यांना आरोपींनी १२ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान संपर्क साधला होता. दोघांनी १०० ग्रॅम वजनाचे २५ बनावट स्वित्झर्लंड येथील वालकाम्बी सुईस सोन्याचे नाणी खरे दिसणारे पॅकेजिंग मध्ये दाखवून त्यांची फसवणूक करण्याचा कट रचला होता. नाणी खरी असल्याचे समजून सोनी यांनी २.३ कोटी रुपयेत्यांना रोख दिले. (Mumbai Crime)
तक्रारदार यांनी त्यातील एक नाणे तपासण्यासाठी पाठवले असता हे नाणे बनावट असल्याचा अहवाल देण्यात आला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तक्रारदाराने १५ एप्रिल रोजी डोंगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या जबाबाच्या आधारे, बीएनएसच्या कलम ३१६(५), ३१८(४) आणि ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एका गुप्त माहितीवरून कारवाई करताना, वरिष्ठ निरीक्षक लाड आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने सँडहर्स्ट रोडजवळ सापळा रचला. (Mumbai Crime)
हेही वाचा- Feeding to Animals and Birds : आयते अन्न-पाणी देऊन प्राण्यांची जीवनशैली बिघडवू नका !
या ठिकाणी आरोपी आणखी एका व्यापाऱ्याची फसवणूक करण्यासाठी येणार होती, आरोपी या ठिकाणी येताच त्यातील एकाला तक्रारदार सोनी यांनी ओळखले पोलिसांनी तात्काळ आरोपीना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान दोघांनीही फसवणुकीत सहभागी असल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपी पमेश खिमावतकडून २ लाख रुपये रोख जप्त केले, जे घोटाळ्यातील पैशांचा भाग असल्याचे मानले जाते. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले, ज्याने पुढील तपासासाठी सहा दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. (Mumbai Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community