Mumbai Crime : अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची अफवा ; संशयीत ताब्यात

Mumbai Crime : अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची अफवा ; संशयीत ताब्यात

62
Mumbai Crime : अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची अफवा ; संशयीत ताब्यात
Mumbai Crime : अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची अफवा ; संशयीत ताब्यात

मुंबई (Mumbai Crime ) पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची धमकी शुक्रवारी पहाटे प्राप्त झाली. या घटनेनंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून तात्काळ शोध मोहीम हाती घेण्यात आली. तसेच याप्रकरणी एका १९ वर्षीय तरूणाला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, शोध मोहिमेत काहीच संशयास्पद सापडले नाही. ही केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले. (Mumbai Crime )

हेही वाचा-Kedarnath Dham 2025 : केदारनाथ धामचे दरवाजे उघडले ! मंदिर 10 हजार किलो फुलांनी सजवले

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी पहाटे धमकीचा दूरध्वनी आला. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील महिला पोलीस शिपायाने दूरध्वनी उचलला. अंधेरीतील मुकुंद नगर येथील मरोळ पाईप लाईन जवळील अनमोल अपार्टमेंटमध्ये बॅग आहे. त्या बॅगमध्ये बॉम्ब अथवा शस्त्र ठेवले आहे. ते तेथून लवकर येथून हटवा, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे महिला पोलिसाने तात्काळ याबाबतीच माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. (Mumbai Crime)

हेही वाचा- Amit Shah : “हे नरेंद्र मोदींचं सरकार, दहशतवाद्यांना वेचून…” ; अमित शाहांचा पाकड्यांना इशारा

दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या पत्त्यावर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी एका १९ वर्षीय तरूणाला संशयावरून ताब्यात घेतले. कुटुंबियांची चौकशी केली असता त्या तरूणाला ऑटीझम आजार असून तो काहीही बडबडतो, असे त्यांनी सांगितले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता बॉम्ब अथवा शस्त्र सापडले नाही. (Mumbai Crime )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.