Mumbai Crime : कर्णफुलामुळे आईला ओळखले, मात्र डीएनए चाचणीनंतर होईल ओळख उघड

मृत महिलेचा चेहरा पूर्णपणे जळाल्यामुळे ओळख पटवणे पोलिसांना अवघड होऊन बसलेले असतांना पोलिसांना मृतदेहाच्या कानात सोन्याचे कर्णफुले मिळून आली.

52
Mumbai Crime : कर्णफुलामुळे आईला ओळखले, मात्र डीएनए चाचणीनंतर होईल ओळख उघड
Mumbai Crime : कर्णफुलामुळे आईला ओळखले, मात्र डीएनए चाचणीनंतर होईल ओळख उघड

मुंबईतील वडाळा पोलिसांना काही दिवसांपूर्वी ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ च्या जागेवर एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मिळून आलेला मृतदेह आपल्या आईचा असल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. मृत महिलेच्या कानातील कर्णफुले आपल्या आईचे असल्याचे या व्यक्तीने म्हटले असले तरी मृत महिलेचा विद्रुप झालेल्या चेहऱ्यामुळे ही महिला या व्यक्तीची आई आहे का हे खात्री करण्यासाठी पोलिसांकडून या व्यक्तीची आणि मृत महिलेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. (Mumbai Crime)

गुरुवारी रात्री वडाळा पोलिसांना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निर्जन जागेवर एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता. या मृतदेहाचे तीन तुकडे करून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मृत महिलेचा चेहरा पूर्णपणे जळाल्यामुळे ओळख पटवणे पोलिसांना अवघड होऊन बसलेले असतांना पोलिसांना मृतदेहाच्या कानात सोन्याची कर्णफुले मिळून आली. वडाळा मुंबई पोर्ट परिसरात एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला. जिच्या शरीराचे तीन तुकडे झाले होते. वडाळा परिसरात अस्पष्ट चेहरा असलेल्या महिलेचा पोलिसांनी शोध सुरू केला. तेव्हा संगम नगर भागात एक महिला गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वडाळा पोलिसांनी या महिलेची माहिती गोळा करून तिच्या कुटुंबाचा पत्ता शोध घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यावेळी त्या व्यक्तीने मृतदेहावर असलेले दागिने आपल्या आईचे असल्याचे सांगितले. (Mumbai Crime)

(हेही वाचा – World Cup 2023 : विश्वचषकात कोणता संघ कितव्या स्थानावर, कोण पोहोचलं उपांत्य फेरीत, तर कुणाचं आव्हान खल्लास?)

या व्यक्तीने सांगितले की, त्याची आई काही दिवसांसाठी नवी मुंबईत त्याच्या मामाकडे राहण्यासाठी गेली होती. ती अनेकदा घरी येत नाही. त्यामुळे आम्ही तिचा हरवल्याची तक्रार दाखल केली नसल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. या कुटुंबीयांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, केईएम रुग्णालयातील शवगृहात आलेल्या मृत वृद्ध महिला आणि दावा करणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणीसाठी कलिना लॅबमध्ये पाठवतील. डीएनए चाचणीच्या अहवाल नंतरच महिलेची ओळख पटेल अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिलेचा खून करून तिचा मृतदेह जाळणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.