Mumbai Crime : मुंबईतील सुप्रसिद्ध ‘पंजाबी घसीटाराम हलवाई’च्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा दाखल

कुणाल हा काम करीत असलेल्या 'पंजाबी घसीटाराम हलवाई'च्या माहीम येथील कारखान्यात असलेली बेकायदेशीर लिफ्टमध्ये १० फेब्रुवारी रोजी अपघात होऊन गंभीर जखमी झाला होता.

217
Mumbai Crime : मुंबईतील सुप्रसिद्ध 'पंजाबी घसीटाराम हलवाई'च्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा दाखल

मुंबईतील सुप्रसिद्ध ‘पंजाबी घसीटाराम हलवाई’च्या संचालकासह चार जणांविरुद्ध शाहू नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन कामगाराला कामावर ठेवून त्याच्या मृत्यूला जबाबदार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुणाल बिपीन बजाज, उदयभान लालप्रताप सिंग, सुशील शेलाटे, आणि रमजान बाबू खान असे गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. कुणाल बजाज हे मुंबईतील सुप्रसिद्ध ‘पंजाबी घसीटाराम हलवाई’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असून उदयभान हा सुपरवायझर आहे. व इतर दोघे बेकायदेशीर कामासाठी अल्पवयीन मुलांचा पुरवठा करणारे आहे. ‘पंजाबी घसीटाराम हलवाई’ यांचे माहीम येथील जासमीन मिल रोड या ठिकाणी मिठाई बनविण्याचा कारखाना आहे. या ठिकाणी मिठाई बनवून मुंबईतील सर्व शाखेत पोहचवली जाते. (Mumbai Crime)

या कारखान्यात काम करण्यासाठी सुशील शेलाटे, आणि रमजान बाबू खान यांनी मध्यप्रदेश इंदोर येथे राहणारा कुणाल राजेंद्र चौधरी (वय वर्षे १५) याला ‘पंजाबी घसीटाराम हलवाई’ यांच्याकडे कामाला पाठवले होते. कुणाल हा काम करीत असलेल्या ‘पंजाबी घसीटाराम हलवाई’च्या माहीम येथील कारखान्यात असलेली बेकायदेशीर लिफ्टमध्ये १० फेब्रुवारी रोजी अपघात होऊन गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर कुणाल याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान घसीटाराम हलवाई याच्या व्यवस्थापनाकडून रुग्णालयाला खोटी माहिती देऊन जखमी कुणालच्या कुटूंबियांना याची माहिती देण्यात आली नव्हती. (Mumbai Crime)

(हेही वाचा – CM Arvind Kejriwal Arrest : दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; न्यायालयाने निकाल ठेवला राखून)

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुणाल चौधरी या बाल कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद सायन पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, दरम्यान कुणाल चौधरीच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होताच हे प्रकरण शाहू नगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. शाहू नगर पोलिसांनी या प्रकरणी ‘पंजाबी घसीटाराम हलवाई’ च्या संचालकासह चार जणांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली असून कुणाल बजाज हे फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.