गोरेगाव पूर्व (Mumbai Crime) येथील एका ४५ मजली इमारतीवरून १७ वर्षीय विद्यार्थिनीने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ती आंतरराष्ट्रीय शाळेत इयत्ता अकरावीत शिकत होती. आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी तपास केला असता, मुलीच्या बॅगेत एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत तिने आत्महत्येचा निर्णय स्वतःहून घेतल्याचे स्पष्ट करत कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले होते. (Mumbai Crime)
हेही वाचा-Operation Sindoor : ‘या’ निमित्ताने भाजपा घरोघरी वाटणार सिंदूर !
पोलिस तपासात समोर आले की, ही मुलगी मागील सहा वर्षांपासून नैराश्यग्रस्त होती आणि तिच्यावर मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. वडिलांनी दिलेल्या जबाबातही याची पुष्टी झाली असून, मुलीने यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. (Mumbai Crime)
हेही वाचा- उत्तर कोरियाच्या हुकूमशाह किम जोंग उनची Donald Trump यांना धमकी ! कारण काय ?
“सगळ्यांनाच शेवटी मरायचं आहे, मग आपण का जगत आहोत?” असा प्रश्न तिने एकदा मानसोपचारतज्ज्ञांना विचारला होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणात कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त न केल्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (Mumbai Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community