Mumbai Airport : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ५.१ कोटीचे सोने जप्त, २ जणांना अटक

मुंबई विमानतळा(Mumbai Airport)वर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अंदाजे ५.१० कोटी रुपये किमतीचे एकूण ५.७५ किलो सोने जप्त केले आहे. सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विभाग-३ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ(Mumbai Airport) आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली.

77

मुंबई विमानतळा(Mumbai Airport)वर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अंदाजे ५.१० कोटी रुपये किमतीचे एकूण ५.७५ किलो सोने जप्त केले आहे. सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विभाग-३ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ(Mumbai Airport) आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी जप्त केलेले सोने संबंधित व्यक्तींच्या आतील कपड्यांमध्ये व जॅकेटच्या खिशामध्ये लपविण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी २ व्यक्तींना अटक करण्यात आले असून सीमाशुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा राजस्थानात हजाराहून अधिक Bangladeshi Infiltrators, तर हरियाणात ‘बंगाली’ म्हणवणाऱ्या घुसखोरांना बनावट कागदपत्रांसह अटक )

पहिल्या प्रकरणात सीमाशुल्क विभागाने एका प्रतीक्षा कक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला कर्मचारी मार्गाने प्रस्थान क्षेत्रातून जात असताना अडवण्यात आले. त्याच्या आतील कपड्यांमध्ये लपविलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली ०६ पाकिटे हस्तगत करण्यात आली. ज्याचे निव्वळ वजन २८०० ग्रॅम(संपूर्ण वजन २९४७ ग्रॅम) असून अंदाजे किंमत २.४८ कोटी रुपये आहे. हे सोनं संबंधित व्यक्तीस एका विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात सीमाशुल्क विभागाने कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला प्रस्थान क्षेत्रातील कर्मचारी बाहेर पडण्याच्या ठिकाणी जात असताना अडवण्यात आले. त्याच्या अंगावरील जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली ६ पाकिटे हस्तगत करण्यात आली, ज्याचे निव्वळ वजन २९५० ग्रॅम(संपूर्ण वजन ३०७३ ग्रॅम) असून अंदाजे किंमत २.६२ कोटी आहे. सोनं त्याला विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात एका ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.(Mumbai Airport)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.