अवघ्या ४ दिवसांत १५० पेक्षा अधिक Bangladeshi Infiltrators ची धरपकड; अटक न करता थेट बांगलादेशात होणार रवानगी

80
अवघ्या ४ दिवसांत १५० पेक्षा अधिक Bangladeshi Infiltrators ची धरपकड; अटक न करता थेट बांगलादेशात होणार रवानगी
  • प्रतिनिधी 

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा (Bangladeshi Infiltrators) शोध घेऊन त्यांची रवानगी थेट बांगलादेशात करण्यात येत आहे. एकट्या मुंबईत मागील ४ दिवसांत १५० पेक्षा अधिक बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे. या बांगलादेशींना त्यांच्या देशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या घुसखोर बांगलादेशीवर गुन्हे दाखल न करता त्यांची तात्काळ भारताबाहेर त्यांच्या देशात रवानगी करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Khalistani Terrorist ची हिंदूंना पुन्हा धमकी; म्हणे, कॅनडा सोडा)

बांगलादेशी नागरिकांकडून भारत – बांगलादेशची सीमारेषा बेकायदेशीररित्या ओलांडून भारतात घुसखोरी करीत आहे. अनेक वर्षांपासून ही घुसखोरी सुरू असून या बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे (Bangladeshi Infiltrators) प्रमाण भारतात वाढले आहे. भारतात आल्यानंतर या बांगलादेशी नागरिक भारतीय नागरिक असल्याचे खोटे पुरावे तयार करून भारतातील प्रत्येक राज्यात राहत आहे. भारतात घुसखोर बांगलादेशींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर (Bangladeshi Infiltrators) कारवाई तीव्र करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात साल २०२४ पासून पोलिसांकडून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. २०२५ मध्ये ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली होती. २०२४ मध्ये वर्षभरात बांगलादेशी नागरिकांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईपेक्षा जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या कालावधीत सर्वात जास्त घुसखोर बांगलादेशी विरुद्ध कारवाई करण्यात आली होती.

(हेही वाचा – संजय राऊतांवर Sanjay Nirupam यांचा घणाघात; म्हणाले, भांडूपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय ?)

एप्रिल महिन्यात ही कारवाई काही प्रमाणात थंडावली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने (मिनिस्ट्री होम अफेअर) ३० एप्रिल रोजी भारतातील प्रत्येक राज्याला बांगलादेशी विरोधात कारवाईचा आदेश दिला आहे. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर (Bangladeshi Infiltrators) गुन्हे दाखल न करता बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना अटक न करता त्यांची रवानगी बांगलादेशात करण्यात यावी असे आदेश देण्यात आले. या आदेशानंतर पोलिसांनी घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. एकट्या मुंबई पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर अवघ्या ४ दिवसांत १५० पेक्षा अधिक घुसखोर बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिक हे पूर्व उपनगरातील मानखुर्द, ट्रोम्बे, गोवंडी, चेंबूर, परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्या पाठोपाठ परिमंडळ ७ ची कारवाई असून तसेच परिमंडळ ४ ने जवळपास २० जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल न करता त्यांची बांगलादेशात रवानगी करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ही कारवाई पुढे अशीच सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.