MLA Kunal Patil : काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर छापा

203
MLA Kunal Patil : काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर छापा

मागील काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांच्या कारखान्यांवर छापे पडत आहेत. नुकताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली. अशातच आता काँग्रेस (MLA Kunal Patil) आमदार कुणाल पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर छापा टाकण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर शनिवारी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी छापा टाकण्यात आला. त्यासाठी नाशिक, पुणे येथून पथक आले होते. पथकाने येताच सूतगिरणीतील सुरक्षा रक्षकांचे मोबाइल काढून घेत गोदामाच्या चाव्या जप्त केल्या. मात्र, ही कारवाई नेमक्या कुठल्या विभागाने केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.‎

(हेही वाचा – CM Eknath Shinde : शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध)

या पथकाने नाशिक ग्रामीण पोलिसांची मदत‎ घेत हा छापा टाकला. पथकाकडून‎ सायंकाळी उशीरापर्यंत कार्यालयात‎ कागदपत्रे (MLA Kunal Patil) तपासणी सुरू होती. या तपासणी नंतर ही संस्था ‘क’ दर्जामध्ये मोडण्यात आली.

अशातच काही माजी कर्मचारी (MLA Kunal Patil) यांनी केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई झाल्याचे म्हंटले जात आहे. तर गुजरातमधील एका कंपनीला सूतगिरणीने‎ कामाचा ठेका दिला आहे. संबंधित‎ कंपनीच्या चुकीमुळे या सूतगिरणीला‎ चौकशीला सामोरे जावे लागले. तसेच‎ जीएसटी विभागाने त्रुटी काढून ही कारवाई‎ केली. अशी चर्चा रंगली होती.‎

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.