-
प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन निघालेल्या रिक्षाचालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी या मुलीने धावत्या रिक्षातून उडी टाकून स्वतःचा बचाव केल्याची घटना भरदिवसा कल्याणच्या विठ्ठलवाडी येथे घडली. या घटनेने ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालाविरुद्ध गुन्हा दाखल करून रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे. ठाणे जिल्ह्यात यापूर्वी देखील याप्रकारच्या घटना घडल्या असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Crime)
(हेही वाचा – Jammu – Kashmir प्रश्नात तिसऱ्याचा हस्तक्षेप अमान्य; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले)
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे कुटुंबियांसह राहणारी १६ वर्षीय मुलगी रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोठ्या बहिणीला सांगून उल्हासनगरमधील समता नगर येथे राहणाऱ्या मावशीला भेटण्यासाठी तिच्या घरी निघाली होती. उल्हासनगरातील नेताजी नगर येथे पीडित मुलगी ही पायी चालत आली, तेथे उभ्या असलेल्या एका रिक्षाचालाकाला तिने मावशीचा पत्ता सांगून तिथे सोडण्यास सांगितले. दरम्यान रिक्षाचालकाने तीला तीला समता नगर येथे घेऊन न जाता कैलास कॉलनी येथून घेऊन निघाला होता. (Crime)
(हेही वाचा – …तर नव्या इमारतीला NOC मिळणार नाही; मंत्री Pratap Sarnaik यांचा इशारा)
पीडित मुलीने त्याला रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र त्याने रिक्षा न थांबवत तो शिवमंदिरांच्या दिशेने सुसाट निघाला. पीडित मुलीने वारंवार त्याला रिक्षा थांबवण्यास सांगून देखील त्याने रिक्षा थांबवत नव्हता. पीडित मुलीला संशय येताच ती घाबरली आणि रिक्षाचालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने धावत्या रिक्षातून उडी घेऊन स्वतःची सुटका करून घेतली. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवता रिक्षा घेऊन तेथून पळून गेला. पीडित मुलगी तेथून रस्ता विचारत मावशीच्या घरी पोहचली आणि तिने मावस बहिणीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मावस बहीण तिला घेऊन रिक्षावाला याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आली व तिने तक्रार दाखल केली. पीडित मुलीने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community