Minor Girl Abducted : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्काराचा प्रयत्न

160
Minor Girl Abducted : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्काराचा प्रयत्न
Minor Girl Abducted : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्काराचा प्रयत्न

जौनपूर (उत्तर प्रदेश) येथील मच्छली शहरात ६ पुरुषांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी एकीकडे कॅमेरा चालू होता. पीडित मुलीने आरडाओरड करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

(हेही वाचा – BJP Mission 2023 : छत्तीसगड, मध्य प्रदेशातील कमजोर जागांवर लक्ष केंद्रित करा; पंतप्रधान मोदींचा सल्ला)

या भयावह व्हिडिओमध्ये ४ पुरुष अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करताना दिसत आहेत. पीडित तरुणी स्वत:चा बचाव करत आहे, तरीही आरोपी जबरदस्ती करत तिच्या अंगाशी झटत आहेत. पीडितेने आरोपींचा प्रतिकार केला असता आरोपींनी तिचे हात मुरडत तिच्यावर शारीरिक हल्ला केला. पीडित मुलीने आरडाओरडा करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी एका आरोपीने ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली असून हाच व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक माध्यमांवर होत आहे.

या प्रकरणी रसूलाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. ‘काही मुलांनी हे छेडाछेडीचे कृत्य केले आहे. त्यांच्यावर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल’, असे रसूलाबाद पोलीस ठाण्याचे अपर पोलीस उपअधीक्षक एस्.के. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.