Manipur : मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे, खंडणीखोरीमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमणात कोम्बिंग ऑपरेशन्स आणि शोध मोहिमा राबवल्या जात आहेत. या कारवायांमध्ये सुरक्षा दलांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. (Manipur)
(हेही वाचा – महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट : CM Devendra Fadnavis)
रविवारी काकचिंग जिल्ह्यातील (Kakching District) तेजपूर क्रॉसिंग (आयव्हीआर रोड) जवळील अंगांगचिंग इको पार्कजवळ (Angang Ching Eco Park) बंदी घातलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PPL) या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. निंगथौजम थोइबा मेईतेई उर्फ सिंथा (44, रहिवासी सुगानू अवांग मोइरांगथेम लीकाई) आणि मयंगलांबम सोमोरजित सिंग (43, कक्चिंग खुनौ थिंगनम निंगथौ लेइकाई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
(हेही वाचा – Fake call center : पुण्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, परदेशी नागरिकांना धमकावून कोट्यवधींची फसवणूक उघडकीस)
तीन मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन जप्त
दुसऱ्या एका कारवाईत, इम्फाळ पूर्व (Imphal East) जिल्ह्यातील लामलाई पोलीस स्टेशन परिसरातील साओम्बुंग पुलाच्या पूर्वेकडील भागातून KCP (अपुंबा) गटातील एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. मोइरंगथेम हेंबा सिंग उर्फ लैबा (25, रा. पुंगडोंगबाम मायाई लीकाई, इम्फाळ पूर्व) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी सुरक्षा संस्था सतत पावले उचलत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community